पुणे: टी-२० मालिकेत खराब कामगिरीमुळे टीका झालेल्या केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शानदार शतकी खेळी केली. तर कर्णधार आणि यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या. वाचा- दुसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा नियमीत कर्णधार इयान मॉर्गन दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने जोस बटलरकडे कर्णधारपद देण्यात आले. भारतीय संघात श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला संधी दिली. भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. गेल्या सामन्यात ९७ धावा करणारा शिखर फक्त ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा देखील २५ धावांवर माघारी परतला. रोहित बाद झाला तेव्हा भारताची अवस्था २ बाद ३७ अशी होती. वाचा- त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. विराट आणि राहुल यांनी आपआपली अर्धशतक पूर्ण केली. ही जोडी मोठी धावसंख्या करेल असे वाटत असताना विराट कोहली ६६ धावांवर बाद झाला. त्याला पुन्हा एकदा शतक करता आले नाही. दरम्यान विराटने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत सर्वात कमी डावात १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील फक्त दुसरा फलंदाज ठरला. वाचा- विराट बाद झाल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने फक्त २८ चेंडूत ५० धावा केल्या. त्या पाठोपाठ राहुलने वनडेतील पाचवे शतक पूर्ण केले. त्याने ११४ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह ११४ धावा केल्या. अखेरच्या पाच षटकात हार्दिक आणि पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच ठेवली. पंत ४० चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. त्याने ७ षटकार आणि ३ चौकार मारले. अखेरच्या षटकात हार्दिक पंड्या ३५ धावांवर बाद झाला. त्याने १५ चेंडूत ४ षटकार आणि १ चौकारात इतक्या धावा केल्या. भारतीय संघाने सलग पाचव्या वनडेत ३०० हून अधिक धावा केल्या. याआधी भारताने पहिल्या वनडेत देखील ३१७ धावा केल्या होत्या. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वनडेत भारताने ३०२, ३३८ आणि ३०८ धावा केल्या होत्या. याआधी भारताने २०१७ मध्ये अशी कामगिरी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vUIrpc
No comments:
Post a Comment