पुणे: इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडेत आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे पदार्पण शानदार झाले. पंड्याने ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात सर्वात वेगाने अर्धशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झालाय. तर कृष्णाने चार विकेट घेत पदार्पणात भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केली. वाचा- या सामन्यात अनेक क्षण असे होते जे चाहत्यांना नेहमीच लक्षात राहतील. पण पदार्पणात क्रुणाल पंड्याने फलंदाज आणि गोलंदाजीत केलेल्या कामगिरी सोबत अशी एक घटना झाली ज्याने कर्णधार देखील हैराण झाला. भारतीय संघाच्या डावात जेव्हा अखेरच्या काही षटकात क्रुणाल पंड्या आणि केएल राहुल इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत होते, तेव्हा पंड्या आणि यांच्यात वाद झाला. वाचा- नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी स्विकारली. भारतीय डावाची सुरूवात संध झाली. ४० षटकात भारताने २००च्या आसपास धावा केल्या होत्या. पण अखेरच्या १० षटकात राहुल आणि पंड्या यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ४९व्या षटकात टॉम करनची धुलाई सुरू होती. याच ओव्हरमध्ये पंड्याने अर्धशतक पूर्ण केले. तेव्हा या दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. पंड्या आणि करन यांनी एकमेकांकडे पाहून काही तरी बोलले. त्यावर पंड्या त्याच्याकडेपाहून बोलत होता. पंड्या आक्रमक झाल्याचे पाहून अंपायर नितीन मेनन यांना दखल द्यावी लागली. वाचा- तेवढ्यात जोश बटलर देखील तेथे आला आणि तो देखील पंड्याला काही तरी बोलला. डगआउट मध्ये बसलेला कोहलीला समजत नव्हते की मैदानात नेमके काय सुरू आहे. क्रुणाल पंड्या आणि टॉम करन यांच्यात कशामुळे वाद झाला हे तरी समजले नाही. पण ४९व्या षटकात टॉमचा चेंडू अंपायरने वाइड दिला. त्यामुळे टॉम नाराज झाला. तेव्हा तो क्रुणालला काही तरी बोलला. याचे उत्तर क्रुणालने अर्धशतक झळकावल्यानंतर दिले. या सामन्यात क्रुणालने पदार्पणात सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केला. त्याने न्यूझीलंडच्या जॉन मॉरिसचा विक्रम मागे टाकला. मॉरिसने ३५ चेंडू अर्धशतक केले होते. भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी इंग्लंडला ३१८ धावा करायच्या होत्या. १४ षटकात एकही विकेट न गमावता १३५ धावा करणारा इंग्लंडचा डाव २५१ धावांवर संपुष्ठात आला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3faVZae
No comments:
Post a Comment