पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडेला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने आघाडीवर असून ही मॅच जिंकून टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी आहे. वाचा- दोन्ही संघात झालेल्या पहिल्या लढतीत अनेक खेळाडूंना दुखापत झाली होती. भारतीय संघातील रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना अनुक्रमे फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. अय्यरची दुखापत गंभीर असल्यामुळे तो संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही हे आधीच बीसीसीआयने स्पष्ट केले होते. रोहित खेळणार की नाही बाबतचा निर्णय त्याच्या फिटनेसवर ठरवला जाणार होता. रोहितच्या हाताची दुखापत बरी झाल्याने तो संघात कामय आहे. तर श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला विकेटकिपर म्हणून संघात संधी दिली केली आहे. वाचा- पहिल्या लढतीत विकेटकिपर म्हणून केएल राहुलने जबाबदारी पार पाडली होती. आता पंतकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. या सामन्यात सूर्यकुमार यादवला संधी मिळेल असे वाटले होते. पण त्याला पुन्हा वेटिंगवर ठेवण्यात आले. सूर्यकुमारने टी-२० मध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. आजच्या सामन्यात राहुलकडे विकेटकिपर म्हणून जबाबदारी देत श्रेयसच्या जागी सूर्यकुमारला संधी देता आली असती. पण कर्णधार विराटने राहुलला फलंदाज म्हणून संघात कायम ठेवले आणि पंतचा समावेश केला. इंग्लंडच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. इयान मॉर्गन, सॅम बिलिंग्स आणि मार्क वुड यांच्या जागी डेव्हिड मलान, लिव्हिंग स्टोन आणि रिसी टॉफली यांना संघात घेतले आहे. कर्णधार मार्गनच्या जागी इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलर करत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tWPf40
No comments:
Post a Comment