पुणे, : इंग्लंडने भारताविरुद्धची पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका गमावली. अखेरच्या सामन्यातील पराभवासह इंग्लंडच्या हातून मालिका विजय निसटला. पण या मालिका पराभवानंतरही इंग्लंडला चांगलाच फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाचही ट्वेन्टी-२० सामने हे अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले गेले. या मैदानातच भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकाचे सामनेही होणार आहेत. त्यामुळे या मैदानात पाच ट्वेन्टी-२० सामने खेळल्याचा फायदा इंग्लंडला ट्वेन्टी-२० विश्वचषकात होऊ शकतो. त्यामुळे इंग्लंडने भारताविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका गमावली असली तरी त्याचा फायदा त्यांना नक्कीच ट्वेन्टी-२० विश्वचषकात होऊ शकतो. यंदाच्या वर्षअखेरीस भारतात आयसीसी टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन होते आहे. तेव्हा याची पूर्वतयारी करण्यासाठी आयपीएलमधील सहभागाचा पूरेपूर फायदा करून घ्या, असा सल्लाच इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनने आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे. आयपीएलला (इंडियन प्रीमियर लीग) येत्या नऊ एप्रिलपासून सुरुवात होते आहे. मॉर्गन म्हणाला की, 'वर्ल्ड कपसारख्या स्पर्धांची तयारी खूप महत्त्वाची मानली जाते. आम्ही त्याच दृष्टिने विचार करत आहोत. म्हणूनच मी माझ्या इंग्लंड संघातील सहकाऱ्यांना आयपीएलद्वारे भारतातील खेळपट्ट्या, वातावरण यांचा पुरेपूर अभ्यास करण्यास सांगितले आहे. इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये विविध संघांतून खेळतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही स्पर्धा पूर्वतयारीसारखीच असेल'. मॉर्गन हा आयपीएलच्या कोलकाता नाइटरायडर्स संघाचा कर्णधार आहे. इंग्लंडला यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान न्यूझीलंडच्या दोन कसोटींसाठी आणि भारताविरुद्धच्या पाच कसोटींचे यजमानपद भूषवायचे आहे. त्यानंतर टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीचाच भाग म्हणून इंग्लंड संघ पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये भाग घेणार आहे. 'यंदाचा आमचा कार्यक्रम खूपच व्यग्र आहे. याशिवाय आम्हाला बांगलादेश आणि पाकिस्तानचही दौऱ्यासाठी जायचे आहे. टी-२० वर्ल्ड कपसाठी कोणत्या खेळाडूंना निवडावे याचा अंदाज घेण्यासाठी खूप कमी मालिका आहेत. म्हणूनच आयपीएलचे दोन महिने खेळाडूंनी वर्ल्ड कप तयारीचे दिवस असल्यासारखे समजावेत', असे मॉर्गनचे म्हणणे आहे. या व्यग्र कार्यक्रमामुळेच खेळाडूंना आळीपाळीने विश्रांती देण्याची योजना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सुरू केली आहेच; पण पाकिस्तान किंवा बांगलादेशातील मालिकांसाठी सीनियर खेळाडूंना किंवा क्रिकेटचे तीनही प्रकार खेळणाऱ्यांना न नेण्याचा विचारही असल्याचे मॉर्गनने यावेळी नमूद केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cb5wvS
No comments:
Post a Comment