
पुणे, : भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही कोहलीने अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर कोहलीने एक इतिहास रचला आहे. कारण अनोखा विश्वविक्रम रचणारा कोहली हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. कोहली हा जगातील असा पहिलाच फलंदाज ठरला आहे की ज्याने आपल्याच धर्तीवर कमीत कमी डावांमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहे. कोहलीने यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगलाही पिछाडीवर सोडले आहे. कोहलीने १९५ डावांमध्ये भारतामध्ये आपल्या १० हजार धावा आज पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम पॉन्टिंगच्या नावावर होता. पॉन्टिंगने यापूर्वी २१९ डावांमध्ये आपल्याच देशात कमीत कमी डावांमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीमध्ये भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. सचिनने भारतामध्ये खेळताना २२३ डावांमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीमध्ये सचिनबरोबरच श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने आपल्याच देशात खेळताना २२३ डावांमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीमध्ये जयवर्धनेननंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा क्रमांक लागतो. संगकाराने श्रीलंकेमध्ये खेळताना २२९ डावांमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ORm9nT
No comments:
Post a Comment