मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाची तयारी करणाऱ्या ( )ला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा सुरू होण्यास फक्त ९ दिवस शिल्लक असताना महेंद्र सिंह धोनी ( )च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघाकडून खेळणाऱ्या एका खेळाडूने स्पर्धेतून नाव मागे घेतले आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नईची कामगिरी अतीशय खराब झाली होती. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचता आले नव्हे. ही खराब कामगिरी विसरून चेन्नईने या वर्षी जोरदार सराव सुरू केला होता. पण आयपीएलच्या नऊ दिवस आधी त्यांना धक्का बसला आहे. चेन्नईकडून खेळणार ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जोश हेजलवुड( )ने आयपीएलमधून नाव मागे घेतले आहे. चेन्नईची पहिली लढत १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. ही लढत मुंबईत होणार आहे. गुरुवारी हेजलवुडने स्पर्धेतून नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. या कारणामुळे घेतली माघार जोशने आयपीएलमधून माघार घेण्याचे कारण देखील स्पष्ट केले आहे. त्याला यावर्षी होणाऱ्या एशेज आणि टी-२० वर्ल्डकपसाठी स्वत:ला फिट ठेवायचे आहे. ऑस्ट्रेलियाच्या या जलद गोलंदाजाला बायो बबलच्या नियमांपासून स्वतंत्र कुटुंबासोबत काही वेळ घालवायचा आहे. हेजलेवुडने क्रिकेट.कॉम.एयू शी बोलताना सांगितले की, मी बायो बबल आणि क्वारंटाइनमध्ये १० महिने झाले राहतोय. आता क्रिकेटमधून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियात घरी पुढील दोन महिने राहणार आहे. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाने हेजलवुडला खरेदी केले होते. युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने तीन सामने खेळले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wjRQGW
No comments:
Post a Comment