पुणे, : कृणाल पंड्याने पदार्पण करताना विक्रनी अर्धशतक रचले. या अर्धशतकानंतर कृणालला मैदानात रडू आवरत नव्हते, तक त्याचा भाऊ हार्दिकही यावेळी चांगलाच भावूक झाला होता. कृणालने हे आपले विक्रमी अर्धशतक एका खास व्यक्तीला समर्पित केले आहे. सामन्यानंतर एका खास मुलाखतीमध्ये कृणालने ही गोष्ट सांगितली आहे. सामना संपल्यावर कृणालची मुलाखत त्याचा भाऊ हार्दिक घेत होता. त्यावेळी कृणाल म्हणाला की, " माझे स्वप्न आता साकार झाले आहे. भारतीय संघात पोहोचण्यासाठी मी अथक मेहनत घेतली. पण गेले दीड महिने माझ्यासाठी फारच दडपणाचे होते. कारण वडिलांचे या काळात निधन झाले आणि त्याचा मला मोठा धक्का बसला. पण त्यांच्या शुभेच्छा नेहमीच माझ्याबरोबर असतील. त्यामुळेच मी भावुक झालो होतो. तु मला पदार्पण करताना कॅप दिलीस आणि माझ्याकडूनही चांगली कामगिरी झाली. त्यामुळे ही कामगिरी मी वडिलांना समर्पित करतो." कृणाल पुढे म्हणाला की, " वडिलांचे १६ तारखेला निधन झाले, त्यावेळी मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होतो. वडिलांन एक सवय होती की, ते सर्व काही रेडी करुन ठेवायचे. त्यामुळे त्यांचे शूज, पँट, हॅट या सर्व गोष्टी एका बॅगेमध्ये होत्या. या सामन्यासाठी बडोद्याहून निघताना मी ती बॅग घेऊन आलो. मला माहिती आहे की, ते आपल्याबरोबर नाहीत. पण ते ड्रेसिंगरुममध्ये असल्याचा भास मला होत राहीला." वडिलांच्या निधनानंतर कृणाल पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. कृणालच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तो सय्यद मुश्ताक अली करंडक खेळत होता आणि बडोद्याच्या संघाचे नेतृत्व करत होता. पण वडिलांच्या निधनामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती आणि बायो-बबलसोडून घरी जावे लागले होते. आपल्या मुलांनी भारताचे प्रतिनिधीत्व करावे, ही पंड्या बंधूंच्या वडिलांची इच्छा होती आणि ते या दोघांना नेहमीच पाठिंबा देत होते. वडिल गेल्यानंतर कृणालला पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची आज संधी मिळाली. या संधीचे सोने करत कृणालने सर्वात जलद पदार्पण करताना अर्धशतक झळकावले. कृणालने जेव्हा आपले अर्धशतक पूर्ण केले तेव्हा आकाशाकडे पाहत तो रडायला लागला. त्यावेळी कृणालचा भाऊ हार्दिकही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात कृणालने ३१ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५८ धावांची खेळी साकारली. कृणाल आणि हार्दिक या सामन्यात कसे भावुक झाले होते, त्याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/398W9uS
No comments:
Post a Comment