पुणे, : भारताचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात भडकल्याचे पाहायला मिळाले. कोहली आज पुन्हा एकदा पंचांशी मैदानात भिडल्याचे पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय...इंग्लंडच्या फलंदाजांनी यावेळी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी २६व्या षटकात हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी २६ वे षटक भुवनेश्वर कुमार टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बेन स्टोक्सने फटका मारला आणि दोन धावा घेण्याचा इंग्लंडच्या खेळाडूंनी प्रयत्न केला. त्यावेळी कुलदीप यादवच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि त्याने स्टोक्सच्या दिशेने हा चेंडू टाकला. त्यावेळी चेंडू थेट यष्ट्यांना लागला. त्यावेळी कोणत्याही खेळाडूंनी अपील केले नाही. पण त्यावेळी मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे धाव घेतली आणि स्टोक्स धावचीत झाला की नाही, हे तपासायला सांगितले. यावेळी जेव्हा चेंडू स्टम्पला लागत होता आणि बेल्स उडाल्या होत्या, त्यावेळी स्टोक्सची बॅट ही लाइनवर होती. जोपर्यंत बॅट लाइनवर असते आणि बेल्स उडतात तेव्हा फलंदाजाला बाद द्यायचा नियम आहे. पण तिसऱ्या पंचांनी यावेळी स्टोक्सला नाबाद ठरवले आणि कोहली भडकल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने नेमके काय केले, पाहा...तिसऱ्या पंचांनी नाबाद दिल्यावर कोहली भडकलेला पाहायला मिळाला. मैदानात क्रिझजवळ येऊन कोहली बसला आणि तो पंचांना काही तरी समवाजून सांगायचा प्रयत्न करत होता. जेव्हा बॅट लाइनच्या आतमध्ये असते तेव्हा फलंदाज नाबाद ठरतो, पण जेव्हा बॅट लाइनवर असते तेव्हा फलंदाजाला बाद द्यायला हवे, असे कोहली पंचांना समजावत होता. पण मैदानातील पंचांनी यावेळी कोहलीकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी कोहली अधिकच रागावल्याचे पाहायला मिळाले. पण त्यावेळी कोहलीच्या हातामध्येही काही नव्हते. कारण तिसऱ्या पंचांनी स्टोक्सला नाबाद ठरवून झाले होते आणि मैदानावरील पंचही त्यावेळी काही करु शकत नव्हते. त्यामुळे पंचांशी वाद घालूनही यावेळी विराट कोहलीच्या हाती मात्र काहीच लागले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39ioa34
No comments:
Post a Comment