पुणे: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत ( 3rd odi ) भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३२९ धावा केल्या. भारताकडून , शिखर धवन आणि यांनी अर्धशतक झळकावले. भारताला ५० षटके खेळून काढता आली नाही. वाचा- तिसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाने कुलदीप यादवच्या जागी टी नटराजन याला संधी दिली. तर इंग्लंडने टॉम करनच्या जागी मार्क वुड हा बदल केला. भारतीय संघ या सामन्यात चार जलद गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह खेळत आहेत. वाचा- भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी करून संघाला दमदार सुरूवात करून दिली. रोहित-शिखरने १७व्यांदा शतकी भागिदारी केली. रोहित ३७ धावांवर बाद झाला आणि भारताने पहिली विकेट गमावली. त्यानंतर शिखर धवन ६७ धावांवर माघारी परतला. तर कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा मोइन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने फक्त सात धावा केल्या. कोहली बाद झाल्याने चांगल्या स्थितीत असलेल्या भारताची अवस्था ३ बाद १२१ अशी झाली. कोहलीच्या जागी आलेला केएल राहुल मोठी धावसंख्या करू शकला नाही. तो ७ धावा करून माघारी परतला. वाचा- भारताची अवस्था ४ बाद १५७ अशी असताना ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी विकेट पडू न देता इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९९ धावा केल्या. पंत शतक करेल असे वाटत असताना ७८ धावांवर सॅम करनने त्याची विकेट घेतली. पंतने ६२ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकार मारले. त्यानंतर हार्दिक पंड्या माघारी परतला. हार्दिकने ४४ चेंडूत ६४ धावा केल्या. वाचा- अखेरच्या षटकात फटकेबाजीच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूर (२१ चेंडूत ३० धावा) आणि क्रुणाल पंड्या (३४ चेंडूत २५ धावा) बाद झाले. त्यानंतरच्या दोन विकेट देखील लवकर पडल्या आणि भारताचा ४८.२ षटकात डाव संपुष्ठात आला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w3cgEa
No comments:
Post a Comment