नवी दिल्ली : यावर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये चाहत्यांना वेगळीच रंजकता पाहायला मिळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेमध्ये तिसऱ्या पंचांचे निर्णय काही वेळा वादग्रस्त ठरले होते. काही वेळा तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला असताना मैदानावरील पंचांनी नेमका काय निर्णय दिला आहे, या गोष्टीला जास्त महत्व दिले जायचे. पण आता आयपीएलमध्ये तसे होणार नाही. कारण यावर्षी आयपीएलमध्ये मैदानातील पंच जे सॉफ्ट सिग्नल द्यायचे, त्याचे महत्व जास्त राहणार नाही आणि पंचांना आपला निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. बऱ्याचदा पंचांनी सॉफ्ट सिग्नल म्हणून एखाद्या खेळाडूला बाद दिले तर तिसऱ्या पंचांना त्याला महत्व द्यावे लागायचे. त्यामुळे काही चुकीचे निर्णयही या मालिकेत घेतले गेल्याचे पाहायला मिळाले. पण आयपीएलमध्ये मात्र आता तसे होताना दिसणार नाही. मैदानातील पंच सॉफ्ट सिग्नल देतील, पण तिसऱ्या पंचांनी योग्य चाचपणी करून आपला निर्णय द्यायला आहे, त्यामध्ये सॉफ्ट सिग्नलचे महत्व आता जास्त राहणार नाही आयपीएलचे सामने हे उशिरापर्यंत चालतात, अशीही ओरड काही जणांकडून सुरु होती. या गोष्टीला लगाम घालण्याचाा प्रयत्न बीसीसीआयने केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण यावेळी प्रत्येक संघाने आपली २० षटके ९० मिनिटांमध्येच संपवायची आहेत, असा नविन नियम बीसीसीआयने आयपीएलसाठी बनवला आहे. जर हा नियम मोडीत काढला तर संघातील कर्णधारासह खेळाडूंना दंड होऊ शकतो. त्याचबरोबर ही गोष्ट दोनवेळा घडली तर संघाच्या कर्णधारावर कडक कारवाई होऊ शकते आणि कदाचित कर्णधाराला काही सामन्यांमध्ये खेळताही येऊ शकणार नाही. त्यामुळे बीसीसीआयने नविन बनवलेले आयपीएलचे हे नियम कसे अंमलात आणले जातात, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. आयपीएलमध्ये यावेळी तिसरे पंच कशी भुमिका वठवतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण भारत आणि इंग्लंड यांच्याती मालिकेत तिसऱ्या पंचांनी काही वादग्रस्त निर्णयही दिले होते. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये नेमकं वेगळं काय पाहायला मिळतं, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. यावर्षीचे आयपीएल ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m5sO9T
No comments:
Post a Comment