Ads

Tuesday, March 2, 2021

'IPL मध्ये क्रिकेट नव्हे फक्त पैशांकडे लक्ष दिले जाते'; पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली: on IPLआयपीएलच्या १४व्या हंगामाला एप्रिल महिन्यात सुरूवात होणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी टी-२० लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. अशात संदर्भात एका क्रिकेटपटूने धक्कादायक असे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य करणारा खेळाडू स्वत: आयपीएल स्पर्धा खेळला आहे. वाचा- दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज (Dale Steyn) याने आयपीएल संदर्भात असे वक्तव्य केले आहे जे ऐकल्यानंतर भारतीय चाहत्यांना धक्काच बसेल. स्टेनने पाकिस्तानच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, आयपीएलमध्ये क्रिकेटवर जास्त लक्ष दिले जात नाही. तर पैशांवर फोकस असतो. या उटल पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मात्र क्रिकेटवर जास्त लक्ष दिले दिले जाते. वाचा- जेव्हा तुम्ही आयपीएल खेळायला जाता तेव्हा तिथे इतके मोठे संघ, इतकी मोठी नावे असतात आणि खेळाडूंच्या कमाईवर इतका भर दिला जातो की ज्यामुळे विसरायला होते. पण पीएसएल किंवा लंका प्रीमिअर लीग खेळता तेव्हा तुमचे लक्ष फक्त क्रिकेटवरच असते. वाचा- मी पीएसएल खेळत आहे आणि बऱ्या कालावधीपासून खेळत आहे. लोक माझ्या रुममध्ये येतात आणि फक्त माझ्या क्रिकेट संदर्भात चर्चा करतात. पण आयपीएलमध्ये लोक फक्त तुम्हाला किती पैसे मिळाले हेच विचारतात. तेथे क्रिकेट विसरले जाते. मी यापासून दूर राहू इच्छितो आणि खेळावर फोकस करण्याची इच्छा आहे. वाचा- डेल स्टेनने आयपीएलच्या या हंगामातून माघार घेतली आहे. मला काही काळासाठी आयपीएलमधून दूर रहायचे असल्याचे त्यांने सांगितले. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळत होता. वाचा- सध्या पाकिस्तान सुपर लीग खेळणाऱ्या डेल स्टेनला काही खास कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात त्याने चार षटकात ४४ धावा दिल्या होत्या. आतापर्यंत तो फक्त दोन विकेट घेऊ शकला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bWZFsK

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...