नवी दिल्ली: भारतीय संघातील मुख्य जलद गोलंदाज () ने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात एक देखील ओव्हर टाकली नव्हती. तर पहिल्या डावात ६ ओव्हर टाकल्या होत्या त्याला एक देखील विकेट मिळाली नव्हती. बीसीसीआयच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार आगामी काही सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली जाणार आहे. वाचा- बुमराहने वैयक्तीक कारणामुळे चौथ्या कसोटीसाठी त्याचा विचार केला जाऊ नये असे सांगितले होते. त्यानुसार बुमराहचा चौथ्या सामन्यासाठी विचार केला जाणार नाही. आता बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी देखील विश्रांती दिला जाणार असल्याचे कळते. पुण्यात २३ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. कसोटी मालिकेच्या आधी होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी त्याला आधीच विश्रांती दिली आहे. वाचा- बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मोठी यादी आहे. विशेषत: या वर्षाअखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा विचार करता अनेक जलद गोलंदाज संधी मिळण्याची वाट पाहत आहेत. टी-२० मालिकेत भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरेल. संघात टी.नटराजन, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर आणि नवदीप सैनी यांना संधी मिळू शकते. यापैकी काहींना वनडे संघात देखील संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाचा- अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका १२ मार्चपासून सुरू होणार आहे. या मालिकेनंतर पुण्यात वनडे मालिका होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uMY69p
No comments:
Post a Comment