नवी दिल्ली: भारतात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप होणार आहे. जगातील प्रत्येक संघ या स्पर्धेसाठी तयारी करत आहे. ही स्पर्धा अद्याप लांब असली तरी अशा मोठ्या स्पर्धांसाठीची तयारी आणि संघ तयार करण्याची प्रक्रिया थोडी लांब असते. खेळाडूंची पूर्णपणे टेस्ट करून संघ निवडला जातो. वाचा- टी-२० वर्ल्डकपच्या आधी विस्डेनने ऑल-टाइम टी-२० वर्ल्डकप संघाची निवड केली आहे. या संघात महेंद्र सिंह धोनी आणि या दोघा भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. संघाचे नेतृत्व धोनीकडे देण्यात आलय. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ साली पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. आता धोनी निवृत्त झाला असला तरी भारतीय संघासाठी तो एक महत्त्वाचा विजय होता. वाचा- या संघात पाकिस्तानच्या तिघा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात शाहिद आफ्रिदी, उमर गुल आणि सईद अजमल यांचा समावेश आहे. आफ्रिदीचा समावेश ऑलराउंडर म्हणून, उमर गुल वेगवान तर अजमलचा समावेश फिरकीपटू म्हणून करण्यात आलाय. वाचा- वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा समावेश या संघात सलामीवीर म्हणून करण्यात आलाय. त्याच बरोबर श्रीलंकेचा महेला जयवर्धनेची देखील सलामीवीर म्हणून निवड केली आहे. संघात तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. चौथ्या स्थानावर केव्हिन पिटरसन, पाचव्या स्थानावर मार्लन सॅम्युअल्स तर माइक हसीला सहव्या स्थानावर ठेवण्यात आलय. वाचा- धोनी संघाचा कर्णधार आणि विकेटकिपर असेल, त्याला सातव्या स्थानावर फलंदाजीसाठी ठेवण्यात आले आहे. धोनीनंतर आफ्रिदी आठव्या क्रमांकावर असेल. गोलंदाजीमध्ये संघात श्रीलंकेचा लसिथ मलिंगा याचा देखील समावेश आहे. वाचा- असा आहे ऑल टाइम टी-२० वर्ल्डकप संघ ख्रिस गेल, महेला जयवर्धने, विराट कोहली, केव्हिन पिटरसन, मार्लन सॅम्युअल्स, माइक हसी, एमएस धोनी, शाहिद आफ्रिदी, लसिथ मलिंगा, उमर गुल, सईद अजमल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Pi0nJw
No comments:
Post a Comment