नवी दिल्ली: ( T20)मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या (England Legends) संघाने भारताचा (India Legends) ६ धावांनी पराभव केला. या सामन्या इंग्लंडकडून ()ने ३७ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने ५ षटकार आणि ६ षटकार मारले. त्याच्या या वादळी खेळीने इंग्लंडने २० षटकात १८८ धावा केल्या. वाचा- विजयासाठी मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग हे लवकर बाद झाले. पण त्यानंतर इरफान पठाण()ने ३४ चेंडूत नाबाद ६१ धावांची स्फोटक फलंदाजी केली. वाचा- वाचा- इरफानच्या खेळीने भारतीय संघाला विजय मिळवता आला नसला तरी त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. इरफानने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. तर मनप्रीत गोनीने १६ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. भारतीय संघाला अखेरच्या २ चेंडूत ८ धावा हव्या होत्या. पण त्यांना दोनच धावा करता आल्या. वाचा- स्पर्धेत भारतीय संघाने याआधीच्या सलग तीन सामन्यात विजय मिळवला होता. आता इंग्लंडविरुद्ध मात्र त्यांचा पराभव झाला. या सामन्यात इरफान पठाणच्या वादळी खेळी सर्वांचे मन जिंकले. त्याच्या फलंदाजीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इरफानने फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीत देखील कमाल केली. त्याने चार ओव्हरमध्ये २८ धावात दोन विकेट घेतल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38oeTWM
No comments:
Post a Comment