नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान ( ) यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट सामने सध्या होत नसले तरी आयसीसीच्या स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. या दोन्ही संघांमध्ये इतिहासात अशा अनेक लढती झाल्या आहेत ज्या चाहते कधीच विसरले नाहीत. अशाच एक लढत ३६ वर्षापूर्वी झाली होती जी भारतीय चाहते कधीच विसरणार नाहीत. वाचा- भारतीय संघाने १० मार्च १९८५ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत पाकिस्तानचा पराभव करून (world championship of cricket) अर्थात मिनी वर्ल्डकप जिंकला होता. सुनिल गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली होती. त्यांनी साखळी फेरीत पाकिस्तानचा ६ विकेटनी पराभव केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात न्यूझीलंडवर सात विकेटनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव करत धक्कादायकरित्या फायनलमध्ये स्थान मिळवले. वाचा- अंतिम लढतीत पाकचा कर्णधार जावेद मियादादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कपिल देव आणि चेतन शर्मा यांच्या गोलंदाजीसमोर पाकची अवस्था ४ बाद ३३ झाली. पाकिस्तानला ५० षटकात ९ बाद १७६ धावा करता आल्या. भारताकडून कपिल देव आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. वाचा- विजयासाठई १७७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. ( ) आणि कृष्णमाचारी श्रीकांत यांनी पहिल्या विकेटसाठी १०३ धावांची भागिदारी केली. भारताने १७ चेंडू राखून आणि फक्त २ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. श्रीकांत यांनी ६७ तर रवी शास्त्री यांनी नाबाद ६३ धावा केल्या. श्रीकांत यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर शास्त्री यांना मालिकावीरने गौरवण्यात आले. पुरस्कार म्हणून ऑडी कार मिळाली. ज्यावर बसून भारतीय खेळाडूंनी मैदानाची फेरी मारली. या मालिकेत श्रीकांत यांनी सर्वाधिक २३८ धावा तर शिवरामकृष्ण यांनी सर्वाधिक १० विकेट घेतल्या. रवी शास्त्री यांनी ५ सामन्यात ४५.५०च्या सरासरीने १८२ धावा आणि ८ विकेट घेतल्या. वाचा- ही मालिका सुरू होण्याआधी सुनिल गावस्कर आणि कपिल देव यांच्यात वाद असल्याच्या बातम्या येत होत्या. विजयाचा चषक घेतल्यानंतर गावस्कर यांनी घोषणा केली की ही त्यांच्या नेतृत्वाखालील अखेरची स्पर्धा होती. या विजेतेपदानंतर त्यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2POLOO2
No comments:
Post a Comment