नवी दिल्ली: भारतीय संघातून डच्चू मिळालेल्या ()ने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजीचा फॉर्म कायम ठेवला आहे. पृथ्वीने ()च्या सेमीफायनलमध्ये कर्नाटकच्या () विरुद्ध शतकी खेळी केली. वाचा- मुंबईचा कर्णधार असलेल्या पृथ्वीने याआधी क्वार्टर फायनलमध्ये शतक केले होते. आता पुन्हा एक शतकी खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात खराब झाली यशस्वी ययस्वाल ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर आदित्य तारे देखील १६ धावांवर माघारी परतला. हे दोन फलंदाज कमी धावसंख्येवर बाद झाले असले तरी दुसऱ्या बाजूने पृथ्वीची फटकेबाजी सुरू होती. पृथ्वीने प्रथम ४८ चेंडूत अर्धशतक केले आणि नंतर ७९ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह शतक पूर्ण केले. वाचा- मुंबईने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३२२ धावा केल्या. पृथ्वीने १२२ चेंडूत ७ षटकार आणि १७ चौकारांसह १६५ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १३५.२५ इतका होता. पृथ्वी वगळता मुंबईच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक ही करता आले नाही. वाचा- या स्पर्धेतील पृथ्वीचे हे चौथे शतक ठरले. याआधी त्याने प्रथम दिल्लीविरुद्ध नाबाद १०५, त्यानंतर पुड्डुचेरी विरुद्ध नाबाद २२७ तर सौराष्ट्र विरुद्ध नाबाद १८५ धावा केल्या होत्या. या सामन्याआधी विजय हजारे स्पर्धेत पृथ्वीने ५८९ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या पृथ्वीला संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर तो मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PSx3tA
No comments:
Post a Comment