नवी दिल्ली: भारतीय संघातील सलामीवीर पृथ्वी शॉला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर केल्यानंतर त्याने शानदार कमबॅक केले आहे. विजय हजारे स्पर्धेत मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या या युवा फलंदाजाने स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. कर्नाटक विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने आणखी एक धमाकेदार शतक झळकावले. वाचा- पृथ्वीने स्पर्धेतील चौथे शतक पूर्ण केले. त्याने १२३ चेंडूत १६५ धावा केल्या. पृथ्वीने १२२ चेंडूत ७ षटकार आणि १७ चौकारांसह १६५ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १३५.२५ इतका होता. वाचा- विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मयांक अग्रवालच्या नावावर होता. पृथ्वीने त्याचा विक्रम मागे टाकला. मयांकने २०१८ साली या स्पर्धेत ७२३ धावा केल्या होत्या. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आता या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पृथ्वीच्या नावावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर ६७३ धावा करणारा देवदत्त पडिक्कल आहे. चौथ्या क्रमांकावर देवदत्तच असून त्याने २०१९ साली ६०९ धावा केल्या होत्या. वाचा- या स्पर्धेतील पृथ्वीचे आजचे चौथे शतक ठरले. या चार शतकांमध्ये एका द्विशतकाचा समावेश होता. दिल्लीविरुद्ध त्याने ८९ चेंडूत नाबाद १०५, त्यानंतर पुड्डूचेरीविरुद्ध १५२ चेंडूत २२७, क्वार्टर फायनलमध्ये सौराष्ट्र विरुद्ध १२३ चेंडूत १८५ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3enTNMe
No comments:
Post a Comment