नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकिपर ( )ने कसोटी क्रमवारीत प्रथमच टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. क्रमवारीत पंत ७व्या क्रमांकावर आहे. इतक नव्हे तर त्याने रोहित शर्माच्या क्रमवारीशी बरोबरी केली. वाचा- कसोटी क्रमवारीत रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर आहे. तर हेन्नरी निकोलस देखील याच क्रमांकावर आहे. पंतने ७४७ गुणांसह हे स्थान मिळवले. हे तिनही फलंदाज संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहे. याच्या पुढे पाकिस्तानचा बाबर आझम आहे. त्याचे ७६० इतके गुण आहेत. कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन ९१९ गुणांसह पहिल्या स्थानावर, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या, मार्नस लाबुशाने तिसऱ्या, जो रूट चौथ्या तर विराट कोहली ५व्या स्थानावर आहे. विराटचे ८१४ इतके गुण आहेत. वाचा- नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीचे बक्षिस क्रमवारीत दिसून आले. गोलंदाजांच्या क्रमवारीत आर अश्विन दुसऱ्या तर अष्ठपैलूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या यादीत रविंद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० क्रमवारीचा विचार करता भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर तर इंग्लंड पहिल्या स्थानावर आहे. या दोन्ही संघात १२ मार्च उद्यापासून पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. भारतापेक्षा इंग्लंडकडे सात गुण अधिक आहेत. क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर होता. पण न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका २-३ने पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. पण ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात फक्त एका गुणाचा फरक आहे. वाचा- फलंदाजामध्ये भारताचा केएल राहुल तिसऱ्या स्थानावर घसरला. विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे. अव्वल स्थानी इंग्लंडचा डेव्हिड मलान, एरॉन फिंच दुसऱ्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tm3oaL
No comments:
Post a Comment