नवी दिल्ली: भारताचा मुख्य जलद गोलंदाज ( )ने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच बरोबर तो टी-२० साठी उपलब्ध असणार नाही. टी-२० नंतर होणाऱ्या तीन वनडे मालिकेसाठी देखील बुमराह खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. विश्रांतीसाठी बुमराहने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. वाचा- अचानक बुमराहने सुट्टी का घेतली याबद्दल सर्वांना प्रश्न पडला होता. या चर्चा सोशल मीडियावर अधिक होत होती. काहींच्या मते बुमराहने दुखापतीमुळे सुट्टी घेतली. तर काहींच्या मते त्याने लग्नासाठी सुट्टी घेतली अशा चर्चा सुरू होत्या. वाचा- यासंदर्भात एएनआय दिलेल्या वृत्तानुसार बुमराह लवकरच विवाह करणार आहे आणि त्यासाठी त्याने सुट्टी घेतली आहे. बुमराहने बीसीसीआयला लग्नासाठी सुट्टी हवी आहे असे सांगितले. लग्नाच्या तयारीसाठी त्याने अखेरची कसोटी आणि टी-२० मधून माघार घेतली आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या लढतीत त्याला विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या कसोटीत बुमराहाने जास्त गोलंदाजी करण्याची गरज पडली नाही. मालिकेत भारत सध्या २-१ने आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना ड्रॉ झाला तरी भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचेल. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uZoE7M
No comments:
Post a Comment