नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी बीसीसीआयने सहा शहरांची निवड केली आहे. यामुळे स्पर्धेतील तीन संघांना घरच्या मैदानावर सामने खेळता येणार नाही. आता यावरून नवा वाद सुरू झाला आहे. वाचा- आयपीएलमधील सुरुवातीच्या सत्रातील सामने प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये होणार असल्याने () संघाचे सह मालक नेस वाडिया यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे विचारणा केली आहे. करोना रुग्णांची संख्या कमी असताना देखील पंजाब किंग्ज संघाच्या घरच्या मैदानाची निवड संभाव्य शहरात का केली नाही? असा सवाल वाडिया यांनी केली आहे. () हे पंजाब संघाचे होम ग्राउंड आहे. वाचा- आयपीएलच्या आगामी हंगामाची सुरूवात एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. याचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नाही. ज्या सहा शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राजस्थान, हैदराबाद आणि पंजाब या संघांना घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. करोना रुग्णांची संख्या वाढत असताना देखील मुंबईचा समावेश बीसीसीआयने केला आहे. वाचा- पीटीआयशी बोलताना वाडिया म्हणाले, आम्ही सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या स्थळावरून बीसीसीआयला पत्र लिहले आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की आमची निवड का केली गेली नाही. आम्हाला पंजाबमध्ये खेळण्याची आशा आहे. पंजाबमध्ये करोना रुग्णांची संख्या कमी आहे. राज्यात मंगळवारी ६३५ नवे रुग्ण सापडले तर सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ८३५ इतकी आहे. काही संघांना घरच्या मैदानाचा फायदा होणार नाही हा काळजीचा विषय आहे. मला कल्पना नाही की त्यांनी कोणत्या आधारावर स्थळांची निवड केली, असे वाडिया म्हणाले. वाचा- गेल्या वर्ष करोनामुळे स्पर्धा भारताबाहेर युएईमध्ये झाली होती. पण आता रुग्ण संख्या कमी असल्याने ही स्पर्धा भारतात घेण्याचा विचार आहे. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना परवानगी देऊ नये असे मत वाडिया यांनी व्यक्त केले. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी धरला मोहालीसाठी आग्रह आयपीएलच्या संभाव्य स्थळामध्ये मोहालीचा समावेश न केल्याने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी देखील यावर पुन्हा विचार करावा अशी विनंती बीसीसीआयला केली आहे. आम्ही खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सर्व उपाय योजना करू असे त्यांनी म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sz7ls6
No comments:
Post a Comment