अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड () यांच्यात चौथा कसोटी सामना ४ मार्च पासून सुरू होणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीतील पराभवासह इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायलनच्या स्पर्धेतून बाहेर पडला, तर भारतीय संघासाठी चौथी कसोटी महत्त्वाची ठरणार आहे. या सामन्यात भारताने विजय अधवा ड्रॉ करण्यात यश मिळवले तरी ते WTCच्या फायनलमध्ये पोहोचेल. वाचा- भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी आधी इंग्लंडचा कर्णधार म्हणाला, भारताविरुद्धची ड्रॉ करण्यात यशस्वी झालो तरी कर्णधार म्हणून माझे सर्वात मोठे यश असेल. भारतासाठी ही मॅच फार महत्त्वाची आहे. पण इंग्लंडच्या कर्णधाराच्या मनात ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटावी अशी इच्छा आहे. इंग्लंडने अंतिम कसोटीत विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियात टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. वाचा- क्रिकइन्फोशी बोलताना रुट म्हणाला, गेल्या काही वर्षातील भारतीय भूमीवरील रेकॉर्ड पाहता ही गोष्टी अविश्वसनिय आहे. त्यामुळे ही मालिका ड्रॉ करण्यात जरी यश आले तरी एक मोठा विजय असेल. विशेषत: गेल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर ही गोष्टी महत्त्वाची ठरेल. गेली दोन आठवडे आमच्यासाठी फार आव्हानात्मक होती. मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल. वाचा- कसोटी मालिका बरोबरीत सुटल्यास कर्णधार म्हणून ते माझे यश असेल. गेल्या काही वर्षात आम्ही जी प्रगती केली आहे. ती खुप चांगली आहे. विशेषत: परदेशात आम्ही विजय मिळवले आहेत. जर आम्ही चौथा कसोटी सामना जिंकला तर सहा कसोटीतील हा चौथा विजय असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ohr5BA
No comments:
Post a Comment