Ads

Tuesday, November 17, 2020

आयपीएल संपल्यावर किंग्स इलेव्हन पंजाबच्या क्रिकेटपटूने साधला साखरपुड्याचा मुहुर्त

नवी दिल्ली : या वर्षीच्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हव पंजाब हा संघ चांगलाच चर्चेत राहिला. पण त्यांना आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये स्थान पटकावता आले नाही. आयपीएल संपल्यावर पंजाबच्या संघातील एका खेळाडूने आज आपला साखरपुडा केल्याचे पाहायला मिळाले आहे. गुडघ्यावर बसून या क्रिकेटपटूने आपल्या प्रेयसीला अंगठी घातली. या क्रिकेटपटने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. पंजाबच्या संघातील वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पुरनने आज आपल्या प्रेयसीबरोबर साखरपुडा केला. निकोलस आणि त्याची प्रेयसी कॅथरीना मिग्युल हे बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज या दोघांनी आपला साखरपुडा करायचे ठरवले होते. त्यानुसार निकोलस आणि कॅथरीना यांनी आपला साखरपुडा केला आहे. यावर्षीच्या आयपीएलध्ये निकोलसकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. पंजाबचा संघ अडचणीत असताना निकोलसने काही वेळा चांगली फलंदाजी केली आणि संघाला संकटामधून बाहेर काढले होते. त्याचबरोबर निकोलसकडून यावर्षी चांगले क्षेत्ररक्षणही पाहायला मिळाले होते. त्यामुळे या वर्षीच्या आयपीएलमध्ये निकोलस हा चाहत्यांच्या चांगलाच लक्षात राहिला होता. या वर्षीच्या आयपीएलमध्येही कॅथरीना ही निकोलसला चीअर करण्यासाठी युएईमध्ये आली होती. निकोलस खेळत असताना कॅथरीना त्याला चीअर करत असल्याचे बऱ्याच चाहत्यांनी पाहिले होते. पण ही कॅथरीना आहे आणि ती निकोलसची प्रेयसी आहे हे कोणालाही माहिती नव्हते. कॅथरीन ही आयपीएलमध्ये निकोलसबरोबरच होती. पंजाबच्या संघाबरोबर तीदेखील प्रवास करत होती. सध्याच्या घडीला निकोलस हा वेस्ट इंडिजच्या ट्वेन्टी-२० संघात आहे. वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंडमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत निकोलस हा वेस्ट इंडिजचे प्रतिनिधीत्व करताना सर्वांना पाहायला मिळू शकतो. न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर निकोलस हा ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. या लीगमध्ये पहिल्यांदाच निकोलस खेळायला उतरणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kGmy68

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...