Ads

Wednesday, November 18, 2020

Viral Video ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेटपटूंचा 'सात समंदर पार...' गाण्यावर टी-शर्ट काढून डान्स

नवी दिल्ली: आयपीएल २०२०चा थरार संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. भारताच्या दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने होणार आहे. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. अशातच टीम इंडियातील गब्बर खेळाडू सरावा सोबत नेहमी मस्ती देखील करतो. धवन सोशल मीडियावर सक्रीय असतो. लॉकडाऊनच्या काळात त्याने अनेक व्हिडिओ शेअर केले होते. आता असाच एक व्हिडिओ त्याने ऑस्ट्रेलियातून एक धमाकेदार व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- भारतीय संघ ऑस्ट्रेलियात गेल्यापासून त्यांच्या सरावाचे व्हिडिओ शेअर केले होते. बीसीसीआय आणि खेळाडू त्यांच्या सरावाचे व्हिडिओ शेअर करत असतात. पण शिखर धवनने एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो आणि डान्स करताना दिसत आहे. हे दोघे टी शर्ट काढून डान्स करत आहेत. वाचा- शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सात समुंदर पार मैं तेरे... या गाण्यावर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना धवन म्हणतो, लैला मुझे अभी भी पागल बना रही है...., लॉकडाउनच्या काळात शिखर धवनने मुलगा आणि पत्नीसह अनेक व्हिडिओ शेअर केले होते. धवनच्या या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर व्हायची. वाचा- हे देखील वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2II6a81

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...