नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी सर्वात खराब झाली होती. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. २०२०च्या आयपीएलचा इतिहासमागे ठेवून आता चेन्नई संघाची नजर २०२१ साली होणाऱ्या स्पर्धेवर आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नई संघातील अनेक खेळाडूंनी खराब कामगिरी केली होती. काही खेळाडूंनी वैयक्तीक कारणामुळे माघार घेतील होती. स्पर्धा झाल्यानंतर शेन वॉट्सनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. आता संघ व्यवस्थापनापुढे नवा संघ तयार करण्याचे आव्हान आहे जो चांगली कामगिरी करेल. साठी संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणाला रिलीज करणार याची यादी बीसीसीआयला २० तारखेपर्यंत द्यायची आहे. त्यानंतरच लिलावाची तारीख ठरवली जाईल. वाचा- चेन्नईकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, एम एस धोनी संघात कायम असेल. तर संघाचा उपकर्णधार राहिलेला सुरेश रैनाला ते रिलीज करू शकतात. रैनाने गेल्या वर्षी संघाकडून खेळण्यास नकार दिला होता. रैनाला पुन्हा संघात घ्याचे की नाही याबाबत खुद्द संघ व्यवस्थापन गोंधळात आहे. रैनाची किमत ११ कोटी आहे. २०१८ साली झालेल्या मेगा लिलावाच्या नियमानुसार संघ ज्या खेळाडूंला रिटेन केले होते. त्यामध्ये १५ कोटीचा खेळाडू पहिल्या स्थानावर, ११ कोटीचा दुसऱ्या तर ७ कोटीचा खेळाडू तिसऱ्या स्थानावर होता. रैनाला ११ कोटी मिळत आहेत. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रैनाबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. संघ ११ कोटी रुपये ब्लॉक करू शकते किंवा रैनाला पुन्हा संघात घेऊ शकते. यावर सीएसकेकडून बराच विचार मंथन सुरू आहे. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील रैनाच्या कामगिरीवर बरच काही अवलंबून असेल, असे मानले जाते. ६०० दिवसानंतर मैदानावर परतलेल्या रैनाला चार सामन्यात फक्त ९८ धावा करता आल्या. फलंदाजीत तो संघर्ष करताना आढळला. संघाने जर त्याला रिलिज केले तर २००८ सालानंतर तो प्रथमच लिलावासाठी उपलब्ध असेल. २००८ ते २०१५ रैनना चेन्नईकडून तर २०१६ ते २०१७ गुजरात लायन्सकडून खेळला होता. त्यानंतर तो पुन्हा चेन्नईकडे परतला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nTxYFr
No comments:
Post a Comment