नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. स्पर्धेतील आठ संघांनी रिटेन आणि रिलीझ केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता पुढील महिन्यात १८ तारखेला मिनी लिलाव चेन्नईत होणार आहे. या लिलावात असे काही खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या संघांनी रिलीझ केले आहे. पण आता २०२१च्या हंगामासाठी अन्य संघांकडून त्यांची खरेदी होण्याची शक्यता जवळ जवळ अशक्य आहे. या यादीत चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. वाचा- (Harbhajan Singh)- भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आता ४० वर्षाचा झाला आहे. हरभजनने गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत वैयक्तीक कारणामुळे माघार घेतली होती. हरभजन गेल्या दोन हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. पण या वर्षी त्याने स्वत:हून चेन्नई संघाला रिलीझ करण्याची विनंती केली. वयानुसार हरभजनच्या फिरकीमध्ये तशी जादू राहिली नाही. त्याच बरोबर तो मोठ्या कालावधीपासून क्रिकेट मैदानातून दूर आहे. त्यामुळेच या वर्षी त्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक असेल. वाचा- (Murali Vijay)- चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या मुरली विजय याला या वर्षी रिलीझ करण्यात आले आहे. २०१६ साली मुरली विजयने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ४५३ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने खास कामगिरी केली नाही. २०१७ मध्ये त्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. तर २०१८ मध्ये एक सामना खेळण्यास मिळाला. २०१९ मध्ये दोन तर २०२० मध्ये फक्त ३ मॅच खेळण्याची संधी त्याला मिळाली. आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत तो खेळला नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता या वर्षी लिलावात त्याची विक्री होणार नाही असे दिसते. वाचा- (Karun Nair)- गेल्या १० टी-२० सामन्यात नायरने फक्त ५० धावा केल्या आहेत. सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत देखील तो अपयशी ठरला. त्याची सर्वोच्च धावसंख्या २७ इतकी आहे आणि अशा कामगिरीच्या जोरावर कोणताही संघ त्याच्यावर बोली लावणार नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या करुण नायरने गेल्या हंगामात ४ सामने खेळेल तर त्याच्या आधीच्या सामन्यात फक्त १ मॅच खेळली होती. वाचा- ... (Kedar Jadhav)- भारताच्या या फलंदाजाने सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत वेगवान अर्धशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुखापत आणि खराब फॉर्ममुळे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या या खेळाडूला संघाने या वर्षी रिलीझ केले. केदार आता ३५ वर्षाचा झाला आहे त्यामुळे अन्य खेळाडूंप्रमाणे त्याला संघात घेण्यास फार संघ उत्सुक असणार नाहीत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NHaG9e
No comments:
Post a Comment