मुंबई: with daughter ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. येत्या काही दिवसात म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा सध्या घरी मुलीसोबत आनंदात वेळ घालवतोय. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वत:च्या नेतृत्वाची छाप उमटवणाऱ्या अजिंक्यने सोशल मीडियावर मुली सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हार्टच्या इमोजीसह अजिंक्य म्हणतो, पाच महिने, दोन देश आणि ८ शहर फिरल्यानंतर मी माझ्या आवडत्या शहरात प्रिय व्यक्तीच्या सोबत वेळ घालवण्यासाठी परत आलो. वाचा- वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्या आधी अजिंक्यने आयपीएलच्या १३व्या हंगामात भाग घेतला होती. करोनामुळे २०२० साली आयपीएल स्पर्धा युएईमध्ये घेण्यात आली होती. तेव्हा अजिंक्यने घर सोडले होते. त्यानंतर युएईमधून तो थेट ऑस्ट्रेलियात गेला. त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीपासून त्याने मुलीला पाहिले नव्हते. वाचा- ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्यने भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळून दिला. एडिलेड कसोटीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर उर्वरीत तीन कसोटीत अजिंक्यने दोन सामन्यात विजय मिळून मालिका जिंकून दिली. त्याने मेलबर्न कसोटीत शतकी खेळी केली आणि संघाचा कर्णधार कसा असतो हे दाखवून दिले. संघात प्रत्येक सामन्यांनतर खेळाडू दुखापत होत असताना अजिंक्यने युवा खेळाडूंवर विश्वास ठेवला आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी विजय मिळून दिला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्य पाचव्या स्थानावर आहे. त्याने ८ डावात एक शतकासह २६८ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/365wly9
No comments:
Post a Comment