नवी दिल्ली : भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगवर जाहीर माफी मागायची वेळ आली आहे. हरभजन, भारताचे नाव बदनाम करू नकोस, अशी टीका चाहत्यांनी त्याच्यावर केली होती. त्यानंतर हरभजनने जाहीर माफी मागितल्याचे आता समोर आले आहे. नेमके काय आहे प्रकरण...सध्याच्या घडीला देशामध्ये करोनाच्या लसीबाबत बरीच चर्चा सुरु आहे. यावेळी हरभजनने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये हरभजनने सांगण्याचा प्रयत्न केला होता की, भारताचे अधिकारी करोना लस घेत नाहीत तर आपण लस घेतली, असं दाखवण्याचे नाट ते करत आहेत. करोना लसीबरोबर आपला फोटो ते काढत असून प्रत्यक्षात लस मात्र ते घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे. हरभजनला यावेळी चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. एका चाहत्याने हरभजनला म्हटले आहे की, " तु भारताचा सेलिब्रेटी म्हमून सर्वत्र मिरवत असतो. पण भारताबद्दल तुला अभिमान आहे की नाही... करोनाची लस ही काही कोणत्या एका पक्षासाठी नाही ती संपूर्ण देशासाठी आहे." एका चाहत्याने हरभजनला म्हटले आहे की, " हरभजन, तु केलेलं ट्विट नुसतं डिलीट करुन चालणार नाही. जे सत्य आहे ते तु लोकांपुढे आणायला हवं आणि सर्वांची जाहीर माफीही मागायला हवी." चाहत्यांनी जोरदार ट्रोल केल्यावर हरभजनला आपली चुक कळून आली आहे. हरभजनने यावेळी एक नवीन ट्विट केले असून यामधअये त्याने म्हटले आहे की, " मी सत्यता पडताळून न पाहता ट्विट केले होते, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागत आहे." काही दिवसांपूर्वी हरभजनला एक मोठा धक्का बसला होता. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे हरभजनचे आयपीएलमधील भवितव्य अधांतरी असल्याचेही आता म्हटले जात आहे. त्यामुळे आता हरभजनला लिलावामध्ये कोणता संघ घेणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. पण जर हरभजनला कोणत्याही संघाने घेण्यास इच्छा दर्शवली नाही, तर त्याचे काय होणार, हे पाहावे लागेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sY2otY
No comments:
Post a Comment