Ads

Wednesday, January 20, 2021

IND vs AUS : ऐतिहासिक विजयानंतर रवी शास्त्री यांनी कोणाचे केले कौतुक, पाहा ड्रेसिंगरुममधला खास व्हिडीओ

ब्रिस्बेन, : भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आणि भारतीय संघाचे जोरदार कौतुक सुरु झाले. पण कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी केलेले कौतुक काही औरच असते. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सामना संपल्यावर ड्रेसिंग रुममध्ये काही खेळाडूंचे कौतुक केल्याचे आता समोर आले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. रवी शास्त्री यांनी संघाचे अभनंदन करताना म्हटले की, " एकेकाळी भारतीय संघ ३६ धावांवर ऑलआऊट झाला होता. पण तुम्ही कुठेही डगमगला नाहीत. तुम्ही जिद्द दाखवली, तुमच्यामध्ये काय गुणवत्ता आहे, हे सर्वांना दाखवून दिले. त्यानंतर आपण ही मालिका जिंकून इतिहास रचला. ही गोष्ट एका दिवसात घडलेली नाही. पण या विजयानंतर संपूर्ण जर उभं राहुन तुम्हाला सलाम ठोकत आहे. त्यामुळे हा क्षण आनंद साजरा करायचा आहे, असे क्षण आयुष्यात फार कमी येतात. त्यामुळे या क्षणाचा आनंद तुम्ही लुटलाच पाहिजे." https://ift.tt/2M57DXG शास्त्री पुढे म्हणाले की, " पुजारा हा संघातील जिद्दी योद्धा आहे. पुजारासारखा योद्धा हा कुठेच सापडणार नाही. युवा सलामीवीर शिभमन गिलचेही कौतुक यावेळी करायला हवे. कारण गिलने संघाला चांगली सुरुवात करून दिली. रिषभ पंतने ज्यापद्धतीने फलंदाजी केली, त्याला तोडच नव्हती. कारण तु ज्यापद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे बऱ्याच जणांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर ज्या खेळाडूंनी या मालिकेत पदार्पण केले त्यांनीही आपली गुणवत्ता यावेळी सिद्ध करून दाखवली, त्यामुळे त्यांचेही कौतुक करायला हवे. कारण शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि टी.नटराजन यांनीही यावेळी दिमाखदार कामगिरी केली. त्याचबरोबर संघाचे फिजिओ आणि अन्य सपोर्ट स्टाफलाही यावेळी विसरुन चालणार नाही." रवी शास्त्री अजिंक्य रहाणेबद्दल काय म्हणाले, पाहा...शास्त्री अजिंक्यबद्दल म्हणाले की, " अजिंक्यने जेव्हा संघाचे नेतृत्व सांभाळले तेव्हा भारताची परिस्थिती चांगली नव्हती. पण त्यानंतर भारतीय संघाने अजिंक्यच्या नेतृत्वाखाली दमदार पुनरागमन केले. अजिंक्यने जो संयम दाखवला आणि ज्यापद्धतीने गोष्टी मैदानात हाताळल्या त्याला तोडच नाही. त्यामुळे अजिंक्यचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ivSY3Y

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...