सिडनी : भारताविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला शहाणपण सुचल्याचे सध्या म्हटले जात आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्यांनी चक्क भारतीय वंशाच्या खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात भारतीय वंशाच्या तनवीर संघाला स्थान देण्यात आले आहे. तनवीर हा जालंधरचा असल्याचे आता समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळवणारा तनवीर हा भारतीय वंशाचा दुसरा खेळाडू ठरला आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या संघातून खेळताना तनवीरची कामगिरी नेमकी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी २०१५ साली गुरेंद्र संधूला संघात स्थान दिले होते आणि त्याला भारताविरुद्ध खेळवलेही होते. हा सामना मेलबर्न येथे झाला होता. संधू पंजाबी कुटुंबियातील आहे. संधूचे आई-वडिलांचा जन्म भारतामध्ये झाला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा तनवीर हा दुसरा भारतीय वंशाचा खेळाडू ठरला आहे. जालंधरचा तनवीर हा बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर या संघाकडून खेळतो. आतापर्यंत या लीगमधील १४ सामन्यांमध्ये त्याने २१ विकेट्स मिळवले आहेत. त्यामुळेच त्याची ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड करण्यात आली आहे. लहान असताना तनवीर हा वेगवान गोलंदाजी करायचा. पण कालांतराने त्याने वेगवान गोलंदाजी करणे सोडू दिले होते. त्यानंतर तनवीर हा फिरकी गोलंदाजी करायला लागला होता. सिडनी क्लबकडून खेळताना तनवीरने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असते. पण याच खेळपट्ट्यांवर तनवीरने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आयसीसीच्या युवा विश्वचषकात तनवीर हा ऑस्ट्रेलियाचा मुख्य गोलंदाज म्हणून पुढे आला होता. कारण तनवीरने यावेळी दफक्त सहा सामन्यांमध्ये १५ विकेट्स मिळवल्या होत्या. एका सामन्यात तर तनवीरने फक्त १४ धावात देत पाच फलंदाजांना बादही केले होते. तनवीरच्या कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत स्थान दिले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YpzCEc
No comments:
Post a Comment