नवी दिल्ली: icc ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ ( ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचला आहे. यामुळे जून महिन्यात प्रथमच होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्याची भारतीय संघाची शक्यता वाढली आहे. पण भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर मोठे आव्हान पार करावे लागणार आहे. चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात नजर टाकली तर भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे मुख्य दावेदार आहेत. पण इंग्लंडचा संघ देखील या स्पर्धेत उतरला आहे. आयसीसीने बदलला होता नियम करोना व्हायरसमुळे अनेक कसोटी मालिका झाल्या नाहीत. त्यामुळे आयसीसीने गेल्या नोव्हेंबर महिन्यात टेस्ट चॅम्पियनशिपसाठीच्या नियमात बदल केले. एखाद्या संघाने मिळवलेल्या विजयापेक्षा त्याची एकूण टक्केवारी विचारात घेतली गेली. जाणून घेऊयात समीकरण... भारत (७१.७ टक्के, ४३० गुण) भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील १२० गुणांपैकी ८० गुण भारताने मिळवल्यास ते न्यूझीलंडच्या पुढे राहतील. टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी इंग्लंडला २ सामन्यांच्या फरकाने पराभूत करावे लागले. भारताने एक कसोटी सामना गमवला तर त्यांनी ३ सामने जिंकावे लागतील. भारताला इंग्लंडविरुद्धची मालिका ४-०, ३-१ किंवा किमान २-० ने जिंकावी लागले. जर भारताचा ०-३, ०-४ असा पराभव झाला तर ते अंतिम फेरीत पोहोचणार नाहीत. न्यूझीलंड (७० टक्के, ४२० गुण) न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्याचे अद्याप निश्चिती नाही. त्यामुळे त्यांचे ४२० गुण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्य संघांच्या जय-पराजयावर न्यूझीलंडचे अंतिम फेरीतील स्थान ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ३-०, किंवा २-० असा पराभव केला आणि इंग्लंडने त्यांचे उर्वरीत सर्व सामने जिंकले तर न्यूझीलंड बाहेर पडले. ऑस्ट्रेलिया (६९.२ टक्के, ३३२ गुण) ऑस्ट्रेलियाचे ३ कसोटी सामने शिल्लक आहेत. मेलबर्नमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल त्यांना चार गुणांचा फटका बसला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना ८९ गुण मिळवावे लागतील. ऑस्ट्रेलियाला या मालिकेत ३ किंवा कमीत कमी २ सामने जिंकावे लागतील. तसेच पराभव टाळावा लागले. जर आफ्रिकेने ही मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलिया फायनलच्या स्पर्धेतून बाहेर पडले. इंग्लंड (६५.२ टक्के, ३५२ गुण) इंग्लंडकडे श्रीलंकेविरुद्ध एक आणि भारताविरुद्धचे ४ असे पाच सामने शिल्लक आहेत. लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयानंतर आता त्यांना भारताला ३-० किंवा ४-०ने पराभूत करावे लागले. भारताविरुद्धची मालिका २-२ असी ड्रॉ झाली तरी इंग्लंडचे नुकसान होईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Y2pVvi
No comments:
Post a Comment