नवी दिल्ली, : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजारा दिलं आहे. पुजाराने जर हे चॅलेंज पूर्ण केलं तर अश्विन अर्धी मिशी ठेवून मैदानात उतरणार असल्याचे ठरलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये काही दिवसांत कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी अश्विन आणि भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यामध्ये एका युट्यूब चॅनेलवर संवाद सुरु होता. यावेळी अश्विनने एक चॅलेंज या मालिकेसाठी पुजारासाठी दिलं आहे. आता पुजाराने हे चॅलेंज जर पूर्ण केलं तर अश्विनला अर्धी मिशी काढून मैदानात उतरावे लागणार आहे. या संवादामध्ये अश्विनने विक्रम यांना एक प्रश्न विचारला. अश्विन म्हणाला की, " आतापर्यंत पुजाराने फिरकीपटूवर जोरदार आक्रमण लगावलेले नाही. आतापर्यंत पुजारा कोणत्याही फिरकीपटूच्या गोलंदाजीवर हवेत मोठा फटका मारल्याचे पाहायला मिळाले नाही. पुजारा कधी फिरकीपटूच्या गोलंदाजीवर पुढे येऊटन हवेत मोठा फटका मारेल?" अश्विनच्या प्रश्नावर राठोड म्हणाले की, " ही गोष्ट प्रगतीपथावर आहे, असे आपण म्हणू शकतो. कारण मी पुजाराला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, एकदा तरी फिरकीपटूच्या गोलंदाजीवर पुढे येऊन तु हवेत मोठा फटका मारायला हवा. पण आतापर्यंत पुजाराने तसं केलेलं नाही आणि त्याने आपण असं का केलं नाही, याचे कारणही मला सांगितलं आहे." राठोड यांच्या उत्तरावर अश्विनने सांगितले की, " जर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुजाराने मोइन अली किंवा इंग्लंडच्या कोणत्याही फिरकीपटूच्या गोलंदाजीवर पुढे येऊन हवेत फटका मारला तर मी माझी अर्धी मिशी कापून टाकेन आणि तसाच मी मैदानात उतरेन. पुजारासाठी मी हे खुले चॅलेंज देत आहे." आता पुजारा हे खुले चॅलेंज स्विकारणार का आणि जर त्याने हे चॅलेंज पूर्ण केलं तर अश्विन अर्धी मिशी काढून मैदानात उतरणार का, याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागलेली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3plGnTF
No comments:
Post a Comment