नवी दिल्ली: भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघावर जोरदार टीका होत आहे. देशातील माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या कामगिरीवर घरचा आहेर दिला आहे. विशेषत: कर्णधार टिम पेनचे नेतृत्व आणि त्याची विकेटकिपिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेत. वाचा- एडिलेड कसोटीत ३६ वर बाद झाल्यानंतर भारताने मालिका २-१ ने जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वत:कडे ठेवली. ऑस्ट्रेलियाच्या या खराब कामगिरीवर माजी खेळाडू यांनी संघाला घरचा आहेर दिला. स्टार खेळाडू नसताना आणि दुखापतीने अडचणीत सापडलेल्या भारताने तुमचा पराभव केला, असे हिली म्हणाले. वाचा- वाचा- ऑस्ट्रेलियाचा संघ खराब नाही. पण कोचिंग स्टाफ, वरिष्ठ खेळाडू यांना सुधारणा करण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू इतके वाइट खेळले की भारताच्या दुय्यम संघाने त्याचा पराभव केला. संपूर्ण मालिकेत कर्णधार, उपकर्णधार आणि कोच यांची वागण्याची पद्धत विचित्र होती. क्षेत्ररक्षणात अत्यंत खराब कामगिरी झाली. वाचा- वाचा- सिडनी आणि ब्रिस्बेन मध्ये अभ्यासच केला नाही. नाथन लायनच्या गोलंदाजीपुढे त्याची विकेटकिपिंगचे तंत्र उपयोगाचे नाही. कर्णधार म्हणून तो फार प्रयत्न करतोय असे वाटत नसल्याचे हिली म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iA2BPi
No comments:
Post a Comment