नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गांगुली यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. काल रात्री गांगुली यांना अस्वस्थ वाटत होते, त्याचबरोबर त्यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे आज अखेर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामधून ते बरे झाले होते. पण आता पुन्हा एकदा जानेवारी महिन्यातच दुसऱ्यांदा गांगुली यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. यापूर्वी, भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना शुक्रवारी (१ जानेवारी) छातीत दुखू लागले होते. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गांगुली यांच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत. गांगुली यांना यापूर्वी जेव्हा डिस्चार्ज देण्यात आला होता तेव्हा रुग्णालयातून बाहेर पडताना गांगुलीने एका मित्र जॉयदीपसह एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत तो म्हणतो, तु माझ्यासाठी जे केले आहेस. ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. गेल्या पाच दिवसांपासून तू माझ्यासाठी जे केले आहेस. ती अशी गोष्ट आहे जी मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. मी तुला गेली ४० वर्ष ओळखतोय आणि ही गोष्ट माझ्यासाठी कुटुंबापेक्षा महत्त्वाची आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना गांगुलीने डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36y24IT
No comments:
Post a Comment