नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपली क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंचेच वर्चस्व पाहायला मिळाले आहे. या क्रमवारीतील मानाचे स्थान भारतीय क्रिकेटपटूच्याच नावावर आहे. आयसीसीने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीतील मानाचे अव्वल स्थान भारताचा कर्णधार विराट कोहलीने पटकावले आहे. कोहलीने ८७० गुणांसह या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीतील दुसरे स्थानही भारताच्याच फलंदाजाच्या नावावर आहे. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत दुसरे स्थान भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने पटकावले आहे. रोहित शर्माच्या नावावर ८४२ गुण जमा आहेत. त्यामुळे कोहलीनंतरचे दुसरे स्थान रोहितने मिळवले आहे. पण या दोघांचा अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला अव्वल १० फलंदाजांमध्ये स्थान पटकावता आलेले नाही. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी तिसरे स्थान पटकावलेले आहे. बुमराच्या खात्यामध्ये ७०० गुण जमा आहेत. या क्रमवारीत अव्वल स्थानावर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आहे. बोल्टच्या नावावर ७२२ गुण जमा आहेत. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा आठव्या स्थानावर असल्याचे पाहायला मिळत आहे. आयसीसीने क्रिकेट अधिक रोमांच आणण्यासाठी एका नव्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत आयसीसी 'प्लेअर ऑफ द इयर'ची घोषणा करत होते. आता त्यांनी 'प्लेअर ऑफ द मंथ' देण्याची घोषणा केली आहे. आयीसीसच्या या पहिल्या महिन्यातील पुरस्कारांच्या नामांकनामध्ये भारतीय संघातील जलद गोलंदाज मोहम्मद सिराज, फिरकीटपटू आर अश्विन आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा जलद गोलंदाज टी नटराजन देखील या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. आयसीसीच्या या पुरस्कारासाठी प्रत्येक विभागात तीन खेळाडूंचे नामांकन करेल. विजेत्या खेळाडूची घोषणा महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी केली जाणार आहे. एकूण मतांमध्ये या पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात आलेली अकादमीची मते ९० टक्के असतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cjUQvK
No comments:
Post a Comment