नवी दिल्ली : इंग्लंडचा कर्णधार जो रुटने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अशी कामगिरी केली आहे की, आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी कामगिरी पाहायलाच मिळाली नाही. त्यामुळे रुटचे यावेळी क्रिकेट विश्वात कौतुक होत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रुटने कमालच केली. गॉल येथे सुरु असलेल्या या कसोटी सामन्यात रुटने श्रीलंकेचे दोन विकेट्स पटकावले. पण हे दोन विकेट्स मिळवताना रुटने एकही धाव दिली नाही. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही. पण त्याचबरोबर रुटने या सामन्यात दमदार फलंदाजी केल्याचेही पाहायला मिळाले. रुटच्या दमदार फलंदाजीमुळेच इंग्लंडवर फॉलोऑनची वेळ आली नाही. पण जर रुटने ही खेळी साकारली नसती तर नक्कीच इंग्लंडवर फॉलोऑन आला असता. त्यामुळे या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात रुटची कामगिरी भन्नाट अशीच झाली आहे. या दुसऱ्या सामन्यात रुटने १.५ षटके गोलंदाजी केली. यामधील एक षटक निर्धाव टाकले, त्याचबरोबर त्याच्या या ११ चेंडूंमध्ये एकही धाव घेतली गेली नाही. पण रुटने यावेळी श्रीलंकेच्या लसिथ एमबुलडेनियाला जॉनी बेअरस्टोव्हकरवी झेलबाद केले. त्यानंतर रुटने श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोला क्लीन बोल्ड करत आपली दुसरी विकेट मिळवली. पण या दोन्ही विकेट्स मिळवताना रुटने एकही धाव दिली नाही आणि आतापर्यंत अशी कामगिरी क्रिकेट विश्वात कोणालाही करता आली नाही. रुटच्या या भेदक गोलंदाजीमुळेच श्रीलंकेचा दुरा डाव १२६ धावांवर आटोपला आणि इंग्लंडपुढे विजयासाठी १६४ धावांचे आव्हान देण्यात आले. रुटने दुसऱ्या कसोटी सामन्यात धडाकेबाज फलंदाजीही केली. इंग्लंडच्या संघाची पहिल्या डावात २ बाद ५ धावा अशी बिकट अवस्था असताना रुट फलंदाजीला आला. यावेळी रुटने १८ चौकारांच्या जोरावर १८६ धावांची दमदार खेळी साकारली. रुटच्या या खेळीमुळेच इंग्लंडवर फॉलोऑनची आपत्ती आली नाही. रुटच्या १८६ धावांमुळे इंग्लंडला पहिल्या डावात ३४४ धावा करता आल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळेच इंग्लंडच्या संघाचे या सामन्यातील आव्हान कायम राहीले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sUcxYr
No comments:
Post a Comment