भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या नवीन लुकमुळे सध्याच्या घडीला चांगलाच चर्चेत आला आहे. धोनीने आपला लुक बदलला आहे. धोनीच्या या नवीन लुकचा फोटो आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. धोनी क्रिकेट विश्वात जसा आपल्या नेतृत्वामुळे प्रसिद्ध आहे, तसाच तो आपल्या नवीन लुकसाठीही असतो. गेल्या वर्षभारता धोनीचे बरेच लुक पाहायला मिळाले. पण धोनीचा सध्याचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच धोनीच्या नव्या लुकचे फोटो आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच दिवसांनी धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. कारण या फोटोमध्ये धोनीचे केस पांढरे झालेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर धोनी आता म्हातारा झाला, अशी प्रतिक्रीयाही काही जणांनी दिली होती. पण धोनीचा सध्याच्या लुक हा भन्नाट आहे. धोनीने आपली हेअरस्टाइल यावेळी बदलेली आहे. त्यामुळे धोनी अधिक फ्रेश आणि यंग दिसत आहे. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या ढंगात परतल्याचे चाहत्यांना वाटत आहे. लॉकडाऊनमधील धोनीचा लुक चाहत्यांना पसंत पडला नव्हता. त्यानंतर आयपीएल खेळत असतानाही धोनीचा एक वेगळा लुक पाहायला मिळाला होता. पण तोदेखील चाहत्यांना फारसा रुचलेला नव्हता. पण सध्याच्या घडीला धोनीने जो आपला लुक बदलला आहे, त्यामुळे तो गेल्या वर्षभरापेक्षा वेगळाच दिसत आहे. त्यामुळेच हा लुक चाहत्यांना पसंत पडलेला आहे. काही दिवसांतच आयपीएलचा लिलाव होणार आहे. या लिलावात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ कोणत्या खेळाडूंना संधी देतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण काही दिवसांपूर्वीच चेन्नईच्या संघाने केदार जाधव, हरभजन सिंग, पीयुष चावला, मुरली विजय यांनी सोडचिठ्ठी दिली होती, तर सुरेश रैनाला संघात कायम ठेवले होते. त्यामुळे यापुढे चेन्नईच्या संघात नेमके कोणते बदल होणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे चेन्नईचा नवीन संघ पाहण्यासाठी चाहते आताा आतुर झाले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pihZSS
No comments:
Post a Comment