नवी दिल्ली: आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते () संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबई इंडियन्स संघाने एक मोठा धक्का दिला आहे. वाचा- जागतिक क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांमध्ये आघाडीवर असेल्या अनुभवी श्रीलंकाचा याला मुंबई इंडियन्स संघाने रिलीझ केले आहे. मुंबईने जेम्स पॅटिसन आणि नाथन कुल्टर नाइल यांना देखील रिटेन केले नाही. वाचा- गेल्या वर्षी करोनामुळे आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. मलिंगाने वैयक्तीक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याने करोना काळात कुटुंबासोबत राहणार असल्याचे म्हटले होते. मुंबईने आयपीएल २०२० मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव, सौरव तिवारी आणि धवल कुलकर्णी यांना रिटेन केले आहे. वाचा- मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंह, सौरव तिवारी, अदित्य तरे, कायरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणार पंड्या, अनुकूल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी आणि मोहसिन खान वाचा- रिलीझ केलेले खेळेडू लसित मलिंगा, मिशेल मेक्लेनाघन, जेम्स पॅटिंसन, नाथन कुल्टन नाइल, सेर्फने रादरफोर्ट, प्रिंस बलवंत रॉय, दिग्विजय देशमुख हे सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sJ475Z
No comments:
Post a Comment