अहमदाबाद: जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान () भारतातील गुजरातमधील अहमदाबाद येथे आहे. (motera stadium )ला आता सरदार पटेल स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. २६ जानेवारी २०२० रोजी याचे उद्घाटन झाले होते. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याचे अधिकृत उद्घाटन केले नव्हते. आता या मैदानावर पहिली क्रिकेट मॅच झाली आहे. वाचा- देशात सध्या सुरू असलेल्या स्पर्धेतील नॉकआउटच्या लढती मोटेरा मैदानावर होणार आहेत. २६ जानेवारी म्हणजे आज पहिली क्वार्टर फायनल लढत पंजाब विरुद्ध कर्नाटक यांच्यात झाली. यासह या मैदानावर अधिकृतपणे प्रतिस्पर्धी क्रिकेटला सुरूवात झाली. बीसीसीआयने या मैदानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा- मोटेरा मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. याआधीचे जगातील सर्वात मोठे मैदान ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदान होते. गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात मोठे मैदान म्हणून मोटेराचा समावेश व्हायचा असेल तर या मैदानावर तितके प्रेक्षक उपस्थित राहणे गरजेचे आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या दाव्यानुसार या मैदानावर १ लाख १० हजार प्रेक्षक बसू शकतात. वाचा- वाचा- या मैदानावर ऑलिंपिकसाठीचे स्विमिंग पूल आहे. त्याच बरोबर ११ खेळपट्टी आहेत ज्या लाल आणि काळ्या मातीपासून तयार केल्या आहेत. चार ड्रेसिंग रूम आहेत. हे मैदान ६३ एकर परिसरात उभारण्यात आले आहे. ज्यात क्रिकेट शिवाय बॉक्सिंग, बॅडमिंटन, टेनिस असे कोर्ट आहेत. इतक नव्हे तर हॉकी आणि फुटबॉल फिल्ड या परिसरात आहेत. या मैदानाकडे पाहिल्यानंतर भारत ऑलिंपिकच्या आयोजनाची तयारी करत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36gpBxw
No comments:
Post a Comment