नवी दिल्ली, : भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भारताच्या विजयानंतर आपली एक इच्छा बोलून दाखवली आहे. अश्विनला या भारताच्या खास चाहत्याला भेटायचे आहे आणि त्याला कसे भेटता येईल, असेही अश्विनने यावेळी सोशल मीडियावर म्हटले आहे. पण अश्विनला याच भारताच्या चाहत्याला का भेटायचे आहे, पाहा... नेमकं काय घडलं होतं, पाहा...ऑस्ट्रेलियातील कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या भारतीय चाहत्याला थेट आपल्या देशात निघून जा आणि तिथे आपल्या देशाची बाजू घे, असा दम भारतीय चाहत्याला मैदानातील सुरक्षा रक्षकांनी दिला होता. भारताचे चाहते कृष्णा कुमार यांनी याबाबतचा धक्कादायक खुलास त्यावेळी केला होता. त्यानंतर आता कुमार यांना भेटण्याची इच्छा अश्विनने व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणाबाबत कृष्णन म्हणाले होते की, " सिडनी कसोटी सामन्याचा पाचवा दिवस हा महत्वाचा होता. हा सामना पाहण्यासाठी मी काही बॅनर घेऊन गेलो होतो. या बॅनरवर भारतीय संघाबाबतची भावना लिहीली होती. माझ्या लहान मुलांनी हे बनर बनवले होते. हे बॅनर जास्त मोठेही नव्हते जेणेकरून काही समस्या होईल. पण मी जेव्हा स्टेडियममध्ये शिरलो तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी मला रोखले. मला स्टेडियममधील सुरक्षा रक्षकांनी सांगितले की, तुला जर भारताची एवढीच बाजू घ्यायची असेल तर तिथेच परत जा. तुला जे काही करायचे आहे ते भारतामध्येच जाऊन कर. पण त्याचबरोबर भारतीय संघाबरोबर जे काही मैदानात झाले तेदेखील अन्यायकारकच होते. त्याबाबत बोलण्याचा अधिकार भारतीयांना नाही का, असा सवालही यावेळी उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणात मला न्याय मिळावा, एवढीच माझी अपेक्षा आहे." सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा यांना शिवीगाळ केली होती. त्याचबरोबर चाहत्यांनी त्यांच्यावर वर्णद्वेषी टीकाही केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास आयसीसी करत आहे. त्याचबरोबर दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळानेही दिले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MocWS3
No comments:
Post a Comment