नव दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अडचणींमध्ये आता वाढ होऊ शकते, असे दिसत आहे. यासाठी निमित्त ठरला आहे तो एक फोटो. धवनने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमुळे धवन आता गोत्यात येऊ शकतो, असे दिसत आहे. धवनने काही दिवसांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये धवन एका बोटीमध्ये बसला आहे. या बोटीमध्ये बसला असताना धवनच्या जवळ एक पक्षी आला आणि हा फोटो क्लिक करण्यात आला. हा फोटो धवनने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यानंतर वाद-विवादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला देशभरात बर्ड-फ्ल्यू चे संकट आहे. त्यामध्ये धवनने एका पक्षाबरोबरचा फोटो शेअर केला. त्यानंतर आता धवनला जो बोटचालक घेऊन गेला होता त्याच्यावर आता उत्तर प्रदेश सरकार कारवाई करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण देशभरात असे संकट असताना अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता धवनला जो बोटचालक नदीमध्ये घेऊन गेला होता त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. त्यानंतर आता धवनवर कोणती कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. धवन सध्याच्या घडीला भारतामध्ये सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करत आहे. पण विश्रांतीच्या काळात धवन हा उत्तर प्रदेशमध्ये गेला होता. यावेळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी धवन उत्तर प्रदेशमधील एका नदीत विहार करत होता. त्यावेळी काही पक्षी धवनच्या जवळ आले होते आणि त्याचे काही फोटो धवनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या फोटोंमुळे आता धवनवर कारवाई होऊ शकते, असे संकेत मिळत आहे. आता धवनला घेऊन जाणाऱ्या बोटचालकावर कारवाई होणार असल्याचे दिसत आहे. त्यानंतर धवनची चौकशी होणार का आणि त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे धवनसाठी येणारा कळ हा खडतर असू शकतो, असे म्हटले जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3c6PaVx
No comments:
Post a Comment