Ads

Wednesday, January 20, 2021

IPL 2021: मराठमोळ्या केदार जाधवचं काय झालं; चेन्नईने दिली संधी की डच्चू, पाहा...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुढच्या वर्षीच्या आयपीएलची जोरदार तयारी आता करत आहे. चेन्नईने हरभजन सिंग, पीयुष चावला आणि मुरली विजय यांना संघातून रिलीज केले आहे. पण चेन्नईने सुरेश रैनाला मात्र संघात कायम ठेवले आहे. पण मराठमोळ्या केदार जाधवला चेन्नईच्या संघाने संधी दिली आहे की त्याला डच्चू देण्यात आला आहे, हे आता समोर आले आहे. केदार जाधव हा बऱ्याच कालावधीपासून चेन्नईच्या संघात आहे. यावर्षी केदारवर मोठी जबाबदारी होती. पण केदार पूर्णपणे अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळाले. कारण यावेळी झालेल्या आयपीएलमध्ये केदारला आठ सामन्यांमध्ये फक्त ६२ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे केदार हा ट्रोल झाला होता. त्यामुळे केदारला चेन्नईच्या संघात स्थान द्यायचे की नाही, हा निर्णय कर्णधार धोनीच्या हातात असल्याचे म्हटले जात होते. केदार जाधवला वगळण्याचा निर्णय यावेळी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने घेतला आहे. चेन्नईच्या संघला पुढच्या आयपीएलसाठी नवीन संघ उभारायचा आहे. त्यामुळे संघातील बऱ्याच खेळाडूंना आता वगळले जात आहे. त्यामध्ये आता हरभजन सिंग, पीयुष चावला, मुरली विजय यांच्यासह केदरचाही नंबर लागला आहे. आयपीएलपूर्वीच रैनाने कोणाचेही न ऐकता संघाला सोडण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या संघाला दुबईमध्ये सोडून रैना मायदेशी परतला होता. त्यानंतर रैना आणि संघ मालक एन. श्रीनिवासन यांच्यामध्ये वाद विवाद झाल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यामुळे रैनाला यावेळी पुन्हा चेन्नईच्या संघात स्थान मिळणार की नाही, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नईच्या संघाने रैनाला कायम ठेवले असल्याचे समजते आहे. रैनाकडे संघाचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे रैनाला संघात कायम ठेवल्याचे म्हटले जात आहे. पण त्याचबरोबर बऱ्याच खेळाडूंना आता चेन्नईच्या संघाने सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईचा संघ अजून कोणत्या खेळाडूंना वगळतं, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NewKb2

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...