मुंबई: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून देणारा आणि आतापर्यंत कसोटीत कधीही पराभव न झालेला अजिंक्य रहाणेचे लक्ष्य आता टीम इंडियाच्या वनडे संघात प्रवेश करण्याचे आहे. अजिंक्य मोठ्या कालावधीपासून वनडे संघातून बाहेर आहे. पण कसोटी संघात त्याला उपकर्णधार म्हणून संधी दिली जाते. एका मुलाखतीत अजिंक्यने वनडे संघात खेळण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले, सध्या तरी माझे लक्ष कसोटी संघावर आहे. वनडेत माझे रेकॉर्ड चांगले आहे. चांगली कामगिरी करून वनडेत स्वत:ची जागा पक्की करण्याचा प्रयत्न करेन. अजिंक्यने भारताकडून १६ फेब्रुवारी २०१८ मध्ये अखेरची वनडे खेळील होती. त्याने ९० वनडे खेळल्या आहेत. पण अद्यापही त्याचा वनडेसाठी विचार केला जात नाही. वाचा- वनडेत अजिंक्यच्या नावावर ९० सामन्यातील ८७ डावात ३५ हून अधिक सरासरीने २ हजार ९६२ धावा आहेत. ज्यात ३ शतक आणि २४ अर्धशतकाचा समावेश आहे. वनडेत त्याचा स्ट्राइकरेट ८०च्या जवळ आहे. त्याने २०११ साली वनडेत टीम इंडियाकडून पदार्पण केले होते. त्यानंतर तो बराच काळ वनडे संघात होता. पण नंतर विराट कोहलीने त्याच्याकडे फक्त सलामीवीर म्हणून पाहिले आणि संघातून वगळले. अजिंक्यच्या मते तो वनडे संघात मधळ्या फळीत फलंदाजी करू शकतो. वाचा- ... भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याने ज्या देशात कसोटी क्रिकेट पाहण्यासाठी लोक येत नाहीत तेथे आता प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येतील. कसोटी क्रिकेटमध्ये देखील अखेरच्या तासापर्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. सामने ड्रॉ होण्याची संख्या कमी झाली आहे आणि निकाल लागत आहेत. खेळाडू आयपीएल खेळून येतात आणि कसोटीत विजय मिळून जात आहेत. भारतीय संघाने एक बेंचमार्क सेट केला आहे, असे अजिंक्य म्हणाला. आमचे महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असताना ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. कसोटी क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करू. २०१६ साली भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात मी मैदान भरलेले पाहिले होते. इंग्लंडमध्ये देखील कसोटीसाठी प्रेक्षक असतात. वाचा- भारताच्या राखीव खेळाडूंबद्दल बोलताना तो म्हणाला, यात कोणतीच शंका नही ही आमच्या राखीव खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. शुभमन गिलने आयपीएलमध्ये धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कसोटीत कोणत्याही दबावाशिवाय फलंदाजी केली. मोहम्मद सिराज हा मालिकेच्या अखेरच्या सामन्यात मुख्य गोलंदाज होता. या सर्व खेळाडूंनी भारताच्या अ दौऱ्यात अनुभव मिळवला होता. त्यामुळे पहिल्या आंतरराष्ट्रीय लढतीचा दबाव घेतला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MtWEYc
No comments:
Post a Comment