नवी दिल्ली : तब्बल १० वर्षे तो संघाच्या बाहेर होता. या १० वर्षांत निवड समितीने त्याला एकदाही संधी दिली नाही. पण जेव्हा १० वर्षांनी या क्रिकेटपटूला संधी मिळाली तेव्हा त्याने या संधाचे सोने केले. संधी मिळाल्यावर सलग दोन शतके लगावत या फलंदाजाने निवड समितीचे तोंड बंद केले आहे. या खेळाडूच्या शतकाच्या जोरावर संघाला सहज विजय मिळवता आला. त्याचबरोबर या शतकवीर खेळाडूला यावेळी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. न्यूझीलंडविरुद्धच्या बिकट अवस्थेत या खेळाडूला संधी देण्यात आली. खेळपट्टी आणि वातावरण गोलंदाजीला पोषक असतानाही या खेळाडूने शतक झळकावत आपली निवड सार्थ करून दाखवली. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानच्या फवाद आलमने शतक झळकावले. आलमचे हे सलग दुसरे शतक ठरले. त्यामुळे तब्बल १० वर्षे मला संधी का दिली नाही, असा सवाल आलमने आपल्या कामगिरीच्या माध्यमातून पाकिस्तानच्या निवड समितीला विचारला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आलमने ९ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०९ धावांची दमदार खेळी साकरली. आलमच्या या शतकाच्या जोरावरच पाकिस्तानला ३७८ धावा करता आल्या आणि १५८ धावांची मजबूत आघाडीही घेता आली. आलमच्या या शतकाच्या योगदानामुळेच पाकिस्तानला हा सामना जिंकताही आला. पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आलमलाच यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले. त्यामुळे तब्बल १० वर्षे या खेळाडूला संधी का मिळाली नाही, असा सवाल आता विचारला जात आहे. आलमच्या या शतकी खेळीनंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने निवड समितीला प्रश्न विचारला आहे. अख्तरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " तब्बल एक दशक फवाद आलमसारख्या खेळाडूला संघाबाहेर ठेवण्यासाठी कोण जबाबदार आहे. आलमसारख्या एवढ्या चांगल्या फलंदाजाला संघाबाहेर एवढी वर्षे का ठेवण्यात आले, असा माझा निवड समितीला प्रश्न आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3otF5Vl
No comments:
Post a Comment