![](https://maharashtratimes.com/photo/80448525/photo-80448525.jpg)
नवी दिल्ली: श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात अशी एक घटना घडली आहे जी यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये कधीच घडली नव्हती. गॉल मध्ये सुरू असलेल्या या सामन्यातील दोन्ही डावात श्रीलंकेचा क्रिकेट संघ खास पद्धतीने ऑलआउट झाला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात श्रीलंकेने ३८१ तर दुसऱ्या डावात १२६ धावा केल्या. वाचा- कसोटी क्रिकेटच्या १४५ वर्षाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की एखाद्या संघाच्या सर्व विकेट एकाच पद्धतीच्या गोलंदाजांनी घेतल्या. इंग्लंडच्या जलद गोलंदाजांनी पहिल्या डावात लंकेचा डावा संपुष्ठात आणला. तर दुसऱ्या डावात सर्व विकेट फिरकीपटूंनी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये अशी घटना याआधी कधीच घडली नव्हती. वाचा- पहिल्या डावात ३८ वर्षीय जेम्स एडरसनने ६ विकेट घेतल्या. कसोटी एका डावात ५ विकेट घेणारा तो जगातील सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे. त्याने २९ ओव्हरमध्ये ४० धावा देत ६ विकेट घेतल्या. या शिवाय मार्क वुडने ३ आणि सॅम करनने एक विकेट घेतली. या तीन गोलंदाजांनी लंकेचा डाव संपुष्ठात आणला. वाचा- लंकेच्या दुसऱ्या डावात डॉम बेस आणि जॅक लीच यांनी यजमान संघाला १२६ धावात गुंडाळले. बेसने १६ षटकात ४९ धावा देत ४ तर लीचने १४ षटकात ५९ धावा देत चार विकेट घेतल्या. दोन विकेट जो रुटने घेतल्या. दुसऱ्या डावातील सर्व विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. वाचा- १४५ वर्षात प्रथमच असे घडले कसोटी क्रिकेटची सुरुवात १८७६ साली झाली. त्यानंतर प्रथमच असे झाले की एका प्रकारच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YbCVyW
No comments:
Post a Comment