Ads

Monday, January 25, 2021

ऑस्ट्रेलियाचे वस्त्रहरण करणाऱ्या सहा क्रिकटेपटूंना आनंद महिंद्राचे खास गिफ्ट; शार्दुल म्हणाला...

मुंबई: ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी भारतीय संघाने केली. महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झालेली असताना युवा आणि कमी अनुभव असलेल्या खेळाडूंनी ऐतिहासिक विजय मिळून दिला. भारताच्या या युवा खेळाडूंचे कौतुक सर्वजण करत आहेत. बीसीसीआयने या खेळाडूंना बक्षिस दिले आहे. आयसीसी क्रमवारीत या खेळाडूंनी मोठी मजल मारली. भारताच्या विजयात ज्या सहा युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्यांना उद्योगपती यांनी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. महिंद्रा यांनी स्वत:च्या कंपनीची ऑफ रोडर एसयुव्ही THAR ही गाडी गिफ्ट देण्याचे जाहीर केले. वाचा- भारताच्या ऑस्ट्रेलियातील विजयावर आनंद महिंद्रा फार खुश आहेत. कसोटी मालिकेत खेळणारे युवा खेळाडू मोहम्मद सिराज, टी नटराजन, , वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी या सहा खेळाडूंना महिंद्रा गाडी गिफ्ट देणार आहेत. टीम इंडियातील या सहा पैकी पाच खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पण केले. तर शार्दुलची दुसरी कसोटी मॅच होती. या सहाही खेळाडूंनी अविश्वनिय अशी कामगिरी केली. फक्त दोन सामन्याचा अनुभव असलेला सिराज हा चौथ्या कसोटीत भारताचा मुख्य गोलंदाज होता. शार्दुल आणि सुंदर यांनी ब्रिस्बेनमध्ये विकेट आणि फलंदाजीत सर्वांची मन जिंकले होते. गिलने देखील सलामीवीर म्हणून स्थान निश्चित केले आहे. वाचा- भारताच्या या सहा खेळाडूना आनंद महिंद्र स्वत:च्या पैशातून गाडी भेट देणार आहेत. म्हणजेच यासाठी कंपनी कोणताही पैसा खर्च करणार नाही. या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी ही भेट असल्याचे महिंद्र यांनी सोशल मीडियावरून सांगितले. महिंद्रा यांनी जाहीर केलेल्या गिफ्टबद्दल शार्दुल ठाकूरने त्यांचे आभार मानले आहेत. धन्यवाद सर, तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणे ही मोठी गोष्ट आहे. हे गिफ्ट आम्हा तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल. तुम्ही दिलेल्या गिफ्टसाठी आभारी, असे त्याने म्हटले आहे. THARची मागणी अधिक महिंद्रा कंपनीच्या या गाडीला बाजारात मोठी मागणी आहे. ही गाडी बुक केल्यानंतर ती मिळण्यासाठी ग्राहकांना एक महिना वाट पाहावी लागते. यावरून त्याची क्रेझ आणि मागणी लक्षात येते. अशी गाडी भारताच्या युवा खेळाडूंना भेट मिळाल्यामुळे त्यांचा आनंद नक्कीच वाढला असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3c9vpg0

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...