मुंबई: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या विजयात हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेची महत्वाची भूमिका होती. एडिलेडमधील पराभवानंतर भारत फक्त जिंकला नाही तर ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला. प्रत्येक सामन्यानंतर दुखापतग्रस्त होणारे खेळाडू आणि चौथ्या कसोटीत तर गोलंदाजीत प्रथम श्रेणीचा संघ घेऊन खेळणाऱ्या अजिंक्यने देशाला कसोटीतील सर्वात खास असा विजय मिळून दिला. वाचा- ऑस्ट्रेलियातील विजयानंतर भारतीय संघाचा हा कर्णधार जेव्हा घरी आला तेव्हा त्याचे जंगी स्वागत होणे अपेक्षित होते. अजिंक्यच्या स्वागतासाठी फक्त घरचे नाही तर अख्खी सोसायटी आली होती. पुष्पवर्षाव, तुतारीने त्याचे स्वागत करण्यात आले. सोबत ढोल-ताशे होतेच. अजिंक्य सोसायटीमध्ये येताच तुतारी वाजवण्यात आली आणि त्याच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. वाचा- उपस्थित सोसायटीमधील लोकांनी 'वेल डन अजिंक्य' म्हणत त्याचे स्वागत केले. त्यानंतर 'आला रे आला अजिंक्य' आला अशा घोषणा दिल्या. सहा महिन्यांनी अजिंक्य घरी आला तेव्हा त्याने सर्व प्रथम हातात घेतले ते आपल्या लेकीला, सोबत पत्नी होतीच. अजिंक्य आयपीएलसाठी युएईला गेला होता. त्यानंतर तेथून ऑस्ट्रलियाला गेला. इतक्या दिवसानंतर त्याने प्रथमच मुलीला समोर पाहिले. वाचा- भारतीय आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या या कामगिरीचे कौतुक संपूर्ण जग करत आहे. असा खेळाडू आपल्या जवळ राहतो ही देखील गौरवाची गोष्ट माननाऱ्या त्याच्या शेजाऱ्यांनी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करून मन जिंकले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून आज खेळाडू भारतात परतले आहेत. यातील काही खेळाडू बेंगळुरूमध्ये उतरले आहेत. अजिंक्य मुंबईत आला. मुंबईत परतलेल्या खेळाडूंना क्वॉरन्टीनच्या निमयातून वगळण्यात आलं आहे. विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2M7qcuu
No comments:
Post a Comment