मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामासाठीच्या लिलावाची तयारी सुरू झाली आहे. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा ( ) अनेकदा आयपीएलमधील () संघाच्या सराव सत्रात दिसतो. अर्जुन मुंबईसाठी नेट गोलंदाज म्हणून असतो. भारतीय संघासाठी त्याने नेट गोलंदाजी केली आहे. आता मध्ये अर्जुन खेळताना दिसू शकतो. अर्जुनवर या वर्षी आयपीएलच्या लिलावात बोली लागू शकते. वाचा- अर्जुन तेंडुलकरने सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी मध्ये पदार्पण केले आणि त्याच बरोबर तो आयपीएलच्या लिलावात सहभागी होण्यासाठी पात्र ठरला. ज्युनिअर तेंडुलकरने या वर्षी मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईकडून दोन सामने खेळले आहेत. अर्जुनने खेळलेल्या दोन्ही सामन्यात मुंबईचा पराभव झाला आणि अर्जुनला देखील फार खास कामगिरी करता आली नाही. असे असून देखील तो लिलावासाठी पात्र ठरला आहे. कारण तो सिनिअर संघाकडून खेळलाय. वाचा- बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या लिलावासाठी काही नियम तयार केले आहेत. या नियमानुसार अर्जुनने मुंबईकडून सामना खेळल्यामुळे तो लिलावासाठी पात्र ठरला आहे. आता अर्जुनला ऑनलाइन पद्धतीने लिलावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करावी लागले. ज्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन औपचारिकता पूर्ण करेल. जर अर्जुनने लिलावासाठी उत्सुकता दाखवली तर मुंबई इंडियन्स त्याला विकत घेऊ शकतो. कारण गेली काही वर्ष तो मुंबईच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करत आहेत. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये अर्जुन मुंबईच्या खेळाडंसोबत दिसला होता. आयपीएल २०२१ साठीचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईत होणार आहे. यावर्षी मिनी लिलाव होणार आहे. तर २०२२च्या स्पर्धेआधी मेगा लिलाव होईल. तेव्हा सर्व संघांची पुन्हा एकदा बांधणी आहे. त्याच बरोबर आयपीएलमध्ये दोन नवे संघ सहभागी होणार आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cj9R0A
No comments:
Post a Comment