नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच ( ) यांनी सांगितले. भारतीय संघाने अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत असा एक निर्णय घेतला होता ज्यामुळे मालिका गमवण्याचा धोका होता. पण हा धोका पत्करला आणि त्याचा निकाल भारताने मालिाक २-१ने जिंकली. वाचा- अरुण यांनी सांगितले की, चौथ्या कसोटीत भारताने पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला होता. हा एक प्रकारचा धाडसी निर्णय होता. वॉशिंग्टन सुंदरला पदार्पणाची संधी देण्यात एक मोठी रिस्क होती. त्याने तीन वर्षात एकही प्रथम श्रेणी सामना खेळला नाही. पण सुंदरने सामन्यात शानदार कामगिरी करून संघाच्या विजयाच महत्त्वाचे योगदान दिले. वाचा- अंतिम कसोटीत एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा विचार आम्ही केला होता. पण ते एक नकारात्मक पाऊल ठरले असते. त्यामुळे आम्ही पाच गोलंदाजांसह मैदानात उतरलो. आम्ही तो धोका पत्करला आणि निकाल सर्वांसमोर आहे. वाचा- ब्रिस्बेनमध्ये पाच गोलंदाजांना संधी देणे ही एक मोठी रिस्क होती. अपयश येईल म्हणून आम्ही निर्णय घेण्याचे टाळले नाही. जरी अपयश आले असते तरी आम्ही पुढील काही सामने याच पद्धतीने खेळलो असतो. प्रत्येक पराभव काही तरी शिकवतो आणि त्यातूनच विजय मिळवता येतो, असे अरुण म्हणाले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/367RI25
No comments:
Post a Comment