नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये विजयाचा तिरंगा फडकावल्यावर भारतीय संघ आज मायदेशात दाखल झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आपल्या पहिल्याच मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कमाल केली होती. पण जवळपास दोन महिन्यांच्या दौऱ्यानंतर सिराज जेव्हा भारतात दाखल झाला तेव्हा तो पहिल्यांदा कुठे गेला, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना सिरजाच्या वडिलांचे निधन झाले होते. पण भारताची सेवा करत असल्यामुळे तो मायदेशात वडिलांचे अंतिम दर्शन घेऊ शकला नव्हता. त्यामुळे भारतामध्ये जेव्हा सिराज दाखल झाला तेव्हा पहिल्यांदा तो आपल्या वडिलांची जिथे दफनविधी करण्यात आली तिथे गेला. सिराजने आपल्या वडिलांना यावेळी श्रद्धांजली वाहिली. सिराज यावेळी भावुक झालेला पाहायला मिळाला. कारण सिराजने भारताकडून खेळावे हे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. पण वडिलांचे निधन झाल्यावर त्याला त्यांचे अंतिम दर्शन घेता आले नव्हते. त्यामुळे भारतामध्ये दाखल झाल्यावर सिराज सर्वात पहिली आठवण आली ती आपल्या वडिलांची... सिराज आयपीएल खेळून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये सराव करत असतानाच सिराजला एक वाईट बातमी समजली. आतापर्यंत जे सिराजच्या पाठी ठामपणे उभे असलेल्या वडिलांचे निधन झाले होते. सिराज यावेळी पूर्णपणे खचून गेला होता. पण यानंतर सिराज पुन्हा एकदा सर्व गोष्टी बाजूला सारून उभा राहिला आणि भारताचे नाव त्याने उंचावले. सिराज म्हणाला होता की, " माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी भारताकडून खेळावे. त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे, पण हे पाहण्यासाठी ते आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकलो, याचा आनंद आहे. आजच्या दिवशी मी पाच विकेट्स मिळवल्या आणि संघाच्या कामी आलो. ही कामगिरी नेमकी कशी होती, हे शब्दांत मला वर्णन करून सांगता येणार नाही. वडिलांच्या निधनानंतर मी आईबरोबर संवाद साधला. आईने मला मानसीकरीत्या खंबीर बनवले. त्याचबरोबर वडिलांचे स्वप्न तू पूर्ण करू शकतोस, असेही तिने मला सांगितले. आईशी बोलल्यानंतर मी मानसीकदृष्ट्या कणखर झालो आणि याच गोष्टीचाच फायदा मला ऑस्ट्रेलिाच्या दौऱ्यात झाला."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sI98vR
No comments:
Post a Comment