नवी दिल्ली : भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या पोस्ट या चांगल्याच मजेदार आणि रंजक असतात. आता सेहवागने असा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे की, त्यामध्ये नवरा आपल्या बायकोला कसा आणि किती घाबरतो, हे दाखवण्यात आले आहे. सेहवागचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सेहवागने शेअर केलेला व्हिडीओ हा एका पार्टीमध्ये आहे. उतार वयातही माणसांमध्ये किती जोश असतो, हे या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीकडे पाहून दिसत आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक म्हातारा इसम भन्नाट डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या वयातही तरुणांना लाजवेल, असा डान्स ही व्यक्ती करत आहे. पण ही व्यक्ती डान्स करत असाना तिथे त्याची बायको येथे आणि त्यानंतर नेमकं काय होतं, हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. या पार्टीमध्ये बायकोची एंट्री झाल्यावर त्या म्हाताऱ्या व्यक्तीने धुम ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या व्यक्तीचा बायको थेट काठी घेऊनच या पार्टीमध्ये घुसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच त्या म्हातारा व्यक्ती तिथून पळून गेल्याचे पाहायला मिळत आहे. सेहवागने या व्हिडीओखाली काही ओळीही लिहल्या आहे. या व्हिडीओखाली सेहवागने लिहिले आहे की, वय हे शाश्वत नसंत, पण बायकोची काठी मात्र शाश्वत असते. सेहवागचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच पसंतीस उतरलेला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LVe6VA
No comments:
Post a Comment